सावळेश्वर येथे विठ्ठल - बिरुदेव यात्रेनिमित्त 27 नोव्हेंबरला भव्य, जंगी कुस्त्यांचा आखाडा .....!
सावळेश्वर(दादासाहेब नीळ): - ग्रामदैवत श्री विठ्ठल - बिरुदेव यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे यंदाही सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता भव्य जंगी कुस्त्याचा आखाडा भरणार असून आखाड्याची जय्यत तयारी झाली असून या कुस्त्याच्या फडामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आणि तालुक्यातील कुस्तीपटूंनी आणि हौशी मल्लांनी उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन श्री विठ्ठल बिरुदेव यात्रा पंच कमिटीचे अध्यक्ष सुधीर धर्मा लांडगे आणि उपाध्यक्ष दीपक अनिल गावडे यांनी केले आहे.
यात्रा यशस्वीतेसाठी सावळेश्वर गावचे माजी पंचायत समिती सदस्य तथा सरपंच कालिदास गावडे, मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती धनाजी गावडे, मार्गदर्शक नानासाहेब गावडे ( N. D.), ग्रामपंचायत सदस्य सखाराम साठे, फारूक तांबोळी ,अनिकेत गुंड, अर्जुन साबळे, समाधान गावडे ,सुधीर गावडे, श्रीकांत टेकाळे, दादाराव लांडगे, शहाजी सोनटक्के, लक्ष्मण वाघमोडे सचिन शेंडगे, बिरुदेव शेंडगे , युवा नेते उमेश माने ,बंटी साबळे, नागेश साबळे, फिरोज पठाण, उमेश वाघमोडे, श्रीकांत होनमुटे ,आकाश माळी, बंडू तरटे (मामा), गणपत पवार, औदुंबर पवार, आणि सुधीर मसलकर आदीसह समस्त गावकरी परिश्रम घेत आहेत.
यात्रेचा औचित्य साधून मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून मंदिर आकर्षक आणि नयनरम्य विद्युत रोषणाईने सजविले आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी यात्रेनिमित्त विविध क्रीडा स्पर्धा अतिशय भव्य आणि दिव्य वातावरणामध्ये पार पडतात यंदाही अशा प्रकारच्या स्पर्धाचं आयोजन करण्यात येणार आहे. यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुधीर धर्मा लांडगे हे उपसरपंच म्हणून सध्या अतिशय धुमधडाक्यात कामे करत आहेत. गावातील सर्व जाती धर्माच्या तरुणांना संघटित करून सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये उत्साह निर्माण करण्यामध्ये सुधीर लांडगे आघाडीवर असतात.
राजकीय कार्यामध्ये सुद्धा ते आघाडीवर असतात एकंदरीत ग्रामदैवत श्री विठ्ठल बिरुदेव यात्रेनिमित्त गावातील गावकऱ्यांना वर्गणी न मागता यंदाची यात्रा स्वखर्चातून करण्याचे नियोजन सुधीर लांडगे आणि दीपक गावडे यांनी केले असून या दोघांच्या या उपक्रमांचे युवकांमधून स्वागत होत आहे.
दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने गावकऱ्यांकडून वर्गणी गोळा केली जाते. यंदा गावामध्ये ब्रह्मनाथ मंदिराच्या शिखराचे बांधकाम लोकवर्गणीतूनच सुरू आहे. त्यामुळे गावकऱ्यांवर ताण पडू नये. आणि यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळाचे सावट पसरल्यामुळेच यंदाची यात्रा स्वखर्चातून करण्याचा निर्धार सुधीर लांडगे आणि दीपक गावडे यांनी अतिशय मोठ्या मनाने घेतला.
सध्या गावातील ग्रामदैवत श्री ब्रह्मनाथाच्या शिखराचे काम लोकवर्गणीतून सुरू असून या शिखराच्या बांधकामासाठी ज्यांना वर्गणी द्यायचे आहे. ते आपल्या स्व इच्छेने देऊ शकतात .असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
0 Comments