मनपा निवडणुकीसाठी उत्तरा बरडे यांच्या नावाची घोषणा
पुरुषोत्तम बरडे समर्थकांची हांडे प्लॉट येथे मोठी बैठक

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ७ मधून शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बरडे यांची कन्या उत्तरा बरडे - बचुटे यांच्या नावाची घोषणा मंगळवारी झालेल्या बरडे समर्थकांच्या बैठकीत करण्यात आली. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हांडे प्लॉट येथे झालेल्या या बैठकीप्रसंगी केलेल्या भाषणात पुरुषोत्तम बरडे यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवले.
या बैठकीत प्रसंगी प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे, उत्तरा बरडे - बचुटे, स्वाती रुपनर, वैशाली सातपुते, अर्चना बरडे, लहू गायकवाड, बबलू चौगुले, रणजीत काशीद, दिनकर जगदाळे, सुरेश जगताप, महादेव सलगर, आशुतोष बरडे उपस्थित होते.
पुरुषोत्तम बरडे म्हणाले, गेल्या ३८ वर्षांपासून शिवसेनेच्या विस्तारासाठी विकासासाठी मी अहोरात्र काम केले आहे. अनेक निवडणुकांमध्ये आपला निसटता पराभव झाला आहे. प्रभाग क्रमांक ७ मधून यंदा मात्र विजय आपलाच आहे. प्रभाग क्रमांक सातमध्ये विकासाची कामे करण्यासाठी तरुणांना रोजगार देण्यासाठी तसेच व्यसनमुक्त तरुण घडविण्यासाठी उत्तरा बरडे - बचुटे यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे, असे आश्वासनही पुरुषोत्तम बरडे यांनी याप्रसंगी दिले. आजवर अनेक निवडणूकीत 'गड आला पण सिंह गेला' अशी अवस्था झाली. परंतु यंदा गडही येणार आणि सिंहींण देखील येणार, असेही पुरुषोत्तम बरडे याप्रसंगी म्हणाले.
यावेळी उत्तरा बरडे - बचुटे, सुरेश जगताप, स्वाती रूपनर, राजकुमार माने, अतुल कणसे, आशुतोष बरडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या बैठकीस धनराज जानकर, बाळासाहेब माने, शिवाजीराव बचुटे, तानाजी खटके, ज्ञानेश्वर कांबळे, दादा डिगे, राहुल कालेकर, दत्तात्रय देशमुख, अण्णा गवळी, मीनाक्षी गवळी, सचिन सुरवसे, नागेश पडवळकर, योगेश खटके, योगेश क्षीरसागर, सतीश पवार, अमर जाधव, शाबीर सय्यद, सलीम शेख, धनंजय माळवे, अमर खटके, कैलास व्हनमाने, गणेश आदमाने, विष्णू जवंजाळ, संदीप भोसले, मारुती खानापूरे, अन्वर मिरजकर, शिवाजी शेवतेकर, अतुल कणसे, अमित डोके, राजाभाऊ कोळेकर, गजाभाऊ पटाडे, सिद्राम मुडे, अस्लम शेख यांसह प्रभाग ०७ मधील विविध भागातील प्रमुख कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन नितीन रूपनर यांनी तर आभार समर्थ बरडे यांनी मानले.
राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ
राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ आहे. या खेळात काही चाली राखीव ठेवाव्या लागतात. माझ्यावर विश्वास ठेवा. उमेदवार आणि नगरसेवक आपला असेल. १६ जानेवारी रोजी फटाके जुना पुणे नाका येथील पावन गणपतीसमोरच फुटतील असे सांगत बरडे यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे.
0 Comments