शिवसेना शिंदे गटाकडे ३२८ अर्ज, १०२ जागा लढविण्याची तयारी पूर्ण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून आतापर्यंत ३२८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत. महापालिकेच्या १०२ जागा लढविण्यासाठी पक्षाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिली.
अर्ज घेणाऱ्यांमध्ये सर्व समाजघटकांतील व्यक्तींचा समावेश असून, हिंदू तसेच मुस्लिम मतदारांकडूनही शिंदे गटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला चांगला आकडा गाठता येईल, असा विश्वास अमोल शिंदे यांनी व्यक्त केला.
गेल्या दोन दिवसांपासून इच्छुक उमेदवारांना अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू असून, आज अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस आहे. प्रत्येक प्रभागातून मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार असल्याने अर्जांची संख्या पाचशे ते सहाशेच्या पुढे जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.यावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, तुकाराम मस्के यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक १९ साठी तृतीयपंथीय नरसय्या विठ्ठल बल्ला यांनी अर्ज घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विविध निर्णयांपैकी ‘लाडकी बहीण योजना’ आपल्याला विशेष आवडल्याने आपण शिंदे गटाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे बल्ला यांनी सांगितले. भविष्यातही शिवसेना शिंदे गटासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
.png)
0 Comments