स्वामी समर्थांची सेवा हेच परमभाग्य : श्रेया बुगडे
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज जगाच्या कल्याणासाठी या भूतलावर अवतरले आहेत. अशा या अवलियाची सेवा करणे हे मानवी जीवनाचे परमभाग्य आहे. स्वामी कृपेने ही सेवा मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या जीवनकार्याला लाभली आहे. जीवनातील कोणत्याही सात्त्विक सेवेपेक्षा स्वामी सेवेचे कार्य अत्यंत महान असून, या सेवेचे मूल्यमापन कोणत्याही अन्य सेवेशी करता येत नाही, असे प्रतिपादन मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी केले.
अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी नुकतीच अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांची आरती करून दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, व्यंकटेश पुजारी, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, संतोष जमगे, खाजप्पा झंपले, सागर गोंडाळ, विपुल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments