सोलापूर लातूर धाराशिव सह ' शालू ' खरेदी करण्याकरिता व्ही.आर. पवार मध्ये गर्दी - राजेश पवार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सुप्रसिद्ध अशा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या साडी शो - रूम मध्ये लग्नसराई निमित्त शालू खरेदी करिता सोलापूरसह लातूर, धाराशिव येथील ग्राहक मोठ्या प्रमाणात येत असल्याचे मुख्य व्यवस्थापक राजेश पवार यांनी सांगितले.
साडी क्षेत्रात अत्यंत नावाजलेले व्ही. आर. पवार सारीज यांच्या चाटी गल्ली येथील शोरूम मध्ये लग्नबस्ता व शालू खरेदी करिता सोलापूर शहर परिसरातील तसेच 200 किलोमीटरच्या अंतरावरील सर्व जिल्ह्यातील ग्राहक मोठ्या आनंदाने खरेदी करिता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
खास करून बनारसी सिल्क, कांजीवरम, पैठणी, शालू, घागरा व पार्टीवेअर साड्या तसेच आहेराच्या साड्या घेण्याकरिता महिला ग्राहक मोठ्या प्रमाणात येत आहेत. आहेराच्या साड्या सोबतच सुटिंग - शर्टिंग तसेच ड्रेस मटेरियल देखील व्हीं. आर. पवार मध्ये उपलब्ध आहे.
लग्नाच्या तारखा, मुहूर्त वरचेवर असल्यामुळे खरेदीसाठी महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे. आपली आवडती साडी घेण्याकरिता व गर्दी टाळण्याकरिता इतर दिवशीही सकाळी 11 ते 7 या वेळेत आला तर भरपूर व्हरायटी पाहायला मिळतील असे त्यांनी सांगितले.
आपल्या मनपसंद साड्या खरेदी करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या असे आवाहन अमर पवार, महेश पवार, गिरीश पवार यांनी केले आहे.
0 Comments