इंग्लंड, श्रीलंकासह देश-विदेशातील गारमेंट निर्यातधारकांनी लावली हजेरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 20, 2024

इंग्लंड, श्रीलंकासह देश-विदेशातील गारमेंट निर्यातधारकांनी लावली हजेरी

 इंग्लंड, श्रीलंकासह देश-विदेशातील गारमेंट निर्यातधारकांनी लावली हजेरी

दोन दिवसात 2500 उद्योजकांनी नोंदवला सहभाग : ८ व्या आंतरराष्ट्रीय

 गारमेंट फेअरला उस्फूर्त प्रतिसाद 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या वतीने बेंगलुरु येथे आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय गारमेंट फेअरला दोन दिवसात पंचवीसशेहून अधिक गारमेंट उद्योजकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे, इंग्लंड श्रीलंकासह देश-विदेशातील मोठ्या गारमेंट निर्यातधारकांनी सोलापूरच्या गारमेंट उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी तयारी दर्शवली.

गुजरात, आसाम, बंगलुरु, बिहार, तमिळनाडू, केरळसह भारतातील पंधराहून अधिक राज्यातील गारमेंट उद्योजकांनी गारमेंट फेअर मध्ये सहभाग घेतला. 

बेंगळुरू येथील शृंगार पॅलेस ग्राउंडवर तीन दिवसीय फेअर सुरू आहे. राज्यपाल पी.सी. राधाकृष्णन यांच्या हस्ते बुधवारी, 18 डिसेंबर रोजी गारमेंट फेअरचे उद्घाटन झाले. फेअरच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी सर्व स्टॉलवर उद्योजकांसह विक्रेत्यांची तुडुंब गर्दी होती. सोलापूरच्या गारमेंट उत्पादनाबद्दल माहिती घेताना अनेकजण दिसले. आलेल्या व्यवसायिकांनी सोलापूर गारमेंट युनिफॉर्मच्या कापड अन् शिलाईच्या गुणवत्तेविषयी कौतुक करताना दिसले.

सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शहा, फेअर कमिटीचे अध्यक्ष सुनील मेंगजी, सचिव व्यंकटेश मेंगजी, असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पवार, अमित जैन, अशोक चव्हाण, शैलेंद्र घणाते, रमेश ढाकलिया, रोहन बंकापुरे 

आदी उपस्थित होते. शुक्रवारी, २० डिसेंबर रोजी सायंकाळी आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते फेअरचा समारोप होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages