माकप च्यावतीने अमित शहा यांच्या अवमानकारक वक्तव्याच्या
निषेधार्थ तीव्र निदर्शने
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची हकालपट्टी करा.
कॉ. नरसय्या आडम (मास्तर)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अत्यंत अवमानकारक असे विवादास्पद विधान करून भारतीय जनतेच्या अस्मितेचा आणि लोकभावनेचा अनादर केलेला आहे. इतकेच नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाऐवजी देवाचे नाव घ्या असे विधान करून भारताच्या धर्मनिरपेक्षतेला ठेच पोहचविण्याचे काम सभागृहात केले. हे अत्यंत गंभीर व लोकशाहीला मारक आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचे द्योतक आहे. जी व्यक्ती देशाचे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचा जबाबदार अशा केंद्रीय गृहमंत्री पदावर असणारे अमित शहा हे स्वतःचा कायदा भंग करून देशात अराजकता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केलेला आहे. अशा गृहमंत्र्याची हकालपट्टी करण्याची मागणी माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी निषेध सभेत केले.
शुक्रवार दि. २० डिसेंबर २०२४ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जिल्हा परिषद पूनम गेट येथे माकपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने पार पडली. यावेळी माकपचे कार्यकर्ते यांनी काळे वस्त्र परिधान करून, काळ्या फिती लावून, काळे झेंडे दाखवून निषेध करताना अमित शहा मुर्दाबाद, अमित शहा राजीनामा द्या, अमित शहा माफी माग, मनुवादी सरकार मुर्दाबाद, तडीपार अमित शहा चले जाओ अशा गगनभेदी आवाजात आक्रोश केले. यावेळी पोलिसांनी आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करताच कॉ. युसुफ शेख मेजर यांच्यासह कॉ. नसीमा शेख, ॲड.अनिल वासम, विजय हरसुरे,दत्ता चव्हाण, बाळकृष्ण मल्याळ, दाउद शेख,रफिक काझी, अभिजीत निकंबे, अशोक बल्ला, मधुकर चिल्लाळ, मल्लेशम कारमपुरी आदींनी अमित शहाच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून प्रतिमा फाडून टाकण्यात आली. यावेळी पोलिसांची चांगलीच तारांबळ झाली. चिघळेलेले आंदोलन कॉ. एम.एच.शेख यांनी निवळून निषेध सभेला सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन संविधान कि रक्षा कौन करेगा, हम करेंगे हम करेंगे, संविधान जिंदाबाद अशा घोषणा दिले.
कॉ.एम.एच.शेख यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले कि, भारताला आदर्श असे लोकशाही अधिष्ठित संविधान बहाल करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती राज्य सभेत अवमानकारक विधान करणे हे भारतीयांना कधीही मान्य नाही. अशा दलित, अल्पसंख्यांक विरोधी मनुवादी पुरस्कृत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केंद्रीय गृहमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि संबंध भारतीयांची माफी मागावी. अन्यथा या आंदोलनाला भविष्यात आणखी तीव्र स्वरूप प्राप्त होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी या सरकारची राहील असा गंभीर इशारा यावेळी दिला
यावेळी मंचावर नसीमा शेख, युसुफ शेख (मेजर), व्यंकटेश कोंगारी, शेवंताताई देशमुख, सुनंदा बल्ला, रंगप्पा मरेड्डी, दिनेश घोडके, ॲड.अनिल वासम आदींची उपस्थिती होती. यावेळी विक्रम कलबुर्गी, शंकर म्हेत्रे, विल्यम ससाणे, नरेश दुगाणे, दाऊद शेख, दीपक निकंबे, अमित मंचले, सनी शेट्टी, वीरेंद्र पद्मा, सलीम मुल्ला, वसीम मुल्ला, बाबू कोकणे, किशोर मेहता, शकुंतला पाणीभाते, बाळकृष्ण मल्याळ, जावेद सगरी, अप्पाशा चांगले, शामसुंदर आडम, किशोर झेंडेकर, प्रभाकर गेंट्याल, मोहन कोक्कुल, बालाजी तूम्मा, चंटी बिटला, राजेंद्र गेंटयाल, नरेश गुल्लापल्ली, योगेश आकिम, कादर शेख, वसीम देशमुख, आदींसह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.अनिल वासम यांनी केले.
0 Comments