पुढचं गारमेंट प्रदर्शन दिल्लीत भरवा,पंतप्रधान मोदींना कार्यक्रमाला बोलवू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 20, 2024

पुढचं गारमेंट प्रदर्शन दिल्लीत भरवा,पंतप्रधान मोदींना कार्यक्रमाला बोलवू

 पुढचं गारमेंट प्रदर्शन दिल्लीत भरवा,

पंतप्रधान मोदींना कार्यक्रमाला बोलवू सुभाष देशमुख 

आठव्या आंतरराष्ट्रीय गारमेंट फेअरचे शुक्रवारी बेंगळूरूत समारोप 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरच्या गारमेंट उत्पादकांनी पुढच्या वर्षी दिल्ली सारख्या मोठ्या शहरात गारमेंट फेअर भरवावा. प्रदर्शनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवता येईल. जेणेकरून सोलापूरच्या गारमेंट उत्पादनांची मार्केटिंग आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये करता येईल, अशी अपेक्षा आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. 

सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या वतीने आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय गारमेंट फेअरचे बेंगलुरु येथे शुक्रवारी समारोप झाला. येथील शृंगार पॅलेस ग्राउंडवर तीन दिवसीय फेअर सुरू होता. शुक्रवारी आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते समारोप कार्यक्रम संपन्न झाला. प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या 104 गारमेंट स्टॉल धारकांचा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

या वेळी सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शहा, फेअर कमिटीचे अध्यक्ष सुनील मेंगजी, सचिव व्यंकटेश मेंगजी, अमित जैन, प्रकाश पवार, सतीश पवार, अजय रंगरेज, रोहन बंकापुरे, विनायक माळगे, शैलेंद्र गणाते यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. अमित जैन यांनी सूत्रसंचालन तर प्रकाश पवार यांनी आभार मानले. 

यावेळी सहभाग घेतलेल्या स्टॉलधारकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. पुढचं प्रदर्शन चेन्नईत भरविण्याची सूचना यावेळी काही स्टॉलधारकांनी केली.

महिला सहकारी संस्था स्थापन करा

सरकारी पातळीवर गणवेश संदर्भात दरवर्षी निविदा निघतात. शालेय गणवेशाच्या निविदा देताना महिला सहकारी संस्थांना प्राधान्य दिला जातो. त्यामुळे सोलापुरातील उद्योजकांनी एकत्र येऊन महिला सहकारी संस्था उभारण्याची सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी केली. ते पुढे म्हणाले, यातून सर्वांना समान काम मिळेल. या उद्योगात महिलांची संख्या वाढेल. सोलापुरातील उद्योजक 'मेक इन इंडिया'च्या धरतीवर स्थानिक सोलापुरी गारमेंट उत्पादनात देशभर नाव करत आहेत. येथील उद्योजकांनी मार्केटिंग क्षेत्रात प्रगती करावी. सामूहिक मार्केटिंग यंत्रणा उभी करावी. यातून उद्योगाची प्रगती होईल. उद्योगात उलाढाल वाढेल

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages