नवउद्योजक विकास गुजरात अभ्यास दौरा कार्यक्रम यशसवी खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास दौरा कार्यक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 21, 2024

नवउद्योजक विकास गुजरात अभ्यास दौरा कार्यक्रम यशसवी खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास दौरा कार्यक्रम

 नवउद्योजक विकास गुजरात अभ्यास दौरा कार्यक्रम यशस्वी 

खा. धैर्यशील  मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 

अभ्यास दौरा कार्यक्रम 

अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली,खासदार नवउद्योजक विकास कार्यक्रमांतर्गत,सोलापूर जिल्ह्यातील नवोदित उद्योजकांसाठी गुजरातच्या गांधीनगर येथे आयोजित खाद्यखुराक महाकुंभ मेळाव्याचा अभ्यास दौरा यशस्वीरीत्या पार पडला.                                       

 या उपक्रमासाठी शिवरत्न शिक्षण संस्था,शिवामृत दूध संघ, शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर  दौऱ्यादरम्यान भाग घेतलेल्या उद्योजकांना फूड प्रोसेसिंग,डेअरी, पॅकेजिंग, ब्रँडिंग, लघुउद्योग, यंत्रसामग्री यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांची सखोल माहिती मिळाली.  

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी यावेळी सांगितले कि सोलापूर जिल्ह्यातील आणि माढा लोकसभा मतदारसंघातील तरुणांनी व्यावसायिक क्षेत्रात पुढे यावे, यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत. हे उपक्रम रोजगार निर्मिती बरोबरच परिसराचा आर्थिक विकास घडवून आणतील. 

सांगोला तालुक्यातील सहभागी संकेत बोत्रे यांनी सांगतिले की,"या अभ्यास दौऱ्यातून गुजरातमधील आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्ये शिकता आली. माझ्या उद्योगासाठी अनेक नवीन संकल्पना मिळाल्या."  

"या दौऱ्यातून आधुनिक पॅकेजिंग तंत्रज्ञान आणि इनोव्हेटिव्ह उत्पादने तयार करण्याचे धडे मिळाले."  

तसेच करमाळा तालुक्यातील महिला व्यावसायिक तेजस्विनी घाडगे व रेश्मा जाधव या म्हणाल्या, या अभ्यास दौऱ्यातून गुजरातच्या अन्न प्रक्रिया उद्योगाच्या प्रगतीबद्दल सखोल माहिती मिळाली. येथील शाश्वत व्यावसाय उद्योग विकास पद्धती प्रभावी वाटल्या."गुजरातमध्ये खाद्य चव आणि गुणवत्ता कशी राखली जाते, याचा अनुभव घेतला. माझ्या व्यवसायासाठी नवी रणनीती तयार करता आली." 

या मेळाव्यामुळे तरुण उद्योजकांना आपल्या व्यवसायासाठी प्रेरणा मिळाली असून सोलापूर जिल्ह्यातील व्यावसायिक क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

उपक्रमाचे प्रमुख उद्देश  

नवीन उद्योजक निर्माण करणे आणि सध्याच्या उद्योजकांना सक्षम करणे.केंद्र व राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देऊन त्यांचा लाभ मिळवून देणे. बँकांकडून कर्जप्राप्तीसाठी मदत करणे.  

उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थांशी करार करण्याची संधी उपलब्ध करून देणे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages