Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी संस्थेतर्फे तपोरत्नं योगीराजेंद्र महास्वामीजींच्या पादुकांची मिरवणूक उत्साहात

 नेताजी संस्थेतर्फे तपोरत्नं योगीराजेंद्र महास्वामीजींच्या पादुकांची मिरवणूक उत्साहात



 ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी सादर केले देखावे

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य लिं .श्री ष.ब्र.तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवारी भक्तीमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली.
नेताजी संस्थेच्या अशोक चौकातील कार्यालयात 'श्रीं'च्या , पादुकांचे पूजन श्री व सौ.रुपाली विठ्ठल कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्री गुरु पादुकास रुद्राभिषेक व सहस्त्र बिल्वार्चन हे धार्मिक विधी पार पडले.त्यानंतर  संस्थाध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या नेतृत्वाखाली श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री ष ब्र तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पादुकांची पालखी निलम नगराकडे मार्गस्थ झाली. वाद्याच्या गजरात अशोक चौक, सत्तर फूट रोड, जुना कुंभारी नाका, आकाशवाणी केंद्र, श्रमजीवी नगर, गणेश मंदिर,शरण मठ मार्गे ही मिरवणूक निघाली. नेताजी कनिष्ठ महाविद्यालयाचे लेझीम पथक, राजराजेश्वरी प्राथमिक शाळेचे वेशभूषा सजीव देखावा पथक, राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेचे टिपरी, ढोल,लेझीम पथक, नेताजी इंग्लिश मीडियम स्कूल व प्राथमिक शाळेचे वेशभूषा पथक, नेताजी हायस्कूलचे लेझीम व ढोल पथक, बँड पथक, महास्वामीजींचे वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे पथक, सनई , पुरवंत, महास्वामीजींची सजवलेली पालखी व पादुका, सुवासिनी आरती धारक पथक, कलशधारी पथक, महास्वामीजींची प्रतिमा या क्रमाने शिस्तबद्ध रीतीने मिरवणूक निघाली.नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक शाळेतील आदित्य बिराजदार हा रंभापुरी पीठाच्या जगदगुंरुच्या वेशभूषेत, विजय झिपटे हा उज्जैन पीठाच्या जगदगुंरुच्या वेशभूषेत, सार्थक चिंचोली हा केदार पीठाच्या जगदगुंरुच्या वेशभूषेत, समर्थ बनसोडे हा श्रीशैल पीठाच्या जगदगुंरुच्या वेशभूषेत, सुजय बाळी हा काशी पीठाच्या जगदगुंरुच्या वेशभूषेत , ऐश्वर्या राठोड ही शंकराची वेशभूषेतील सजीव देखाव्यात आकर्षण केंद्र बिंदू होते.याच शाळेतील विद्यार्थ्यांनी नमो नमो शंकरा या गीतावर सुंदर नृत्याविष्कार सादर करत भक्तगणांचे लक्ष वेधून घेत होते.नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलच्या सजीव देखाव्यात शिवशंकराच्या वेशभूषेत प्रथमेश श्रावण तर पार्वतीच्या वेशभूषेत वासंती कोंकत्ती खूप आकर्षक दिसत होते.नेताजी इंग्रजी माध्यमाच्या सजिव देखाव्यात महादेवाच्या वेशभूषेत अभिषेक डोंगराजे, पार्वतीच्या वेशभूषेत नैनाक्षा मेरगु,गणपतीच्या कौशिक देवर,कार्तिकेयेच्या वेशभूषेत ऋषिकेश वंनम, नारदमुनीच्या वेशभूषेत  श्रीकांत बंडा यांनी अतिशय सुंदर दिसत होते. राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेतील रुद्र पाटकळे हा प्रभु श्रीरामाच्या वेशभूषेत,विनय गिनानी हा लक्ष्मणाच्या वेशभूषेत,हर्षद साखरे हा भरताच्या वेशभूषेत,मनस्विनी पवार सीताच्या वेशभूषेत,नागेश मोरे बजरंग बली हनुमानाच्या वेशभूषेत,भाग्यश्री मरबे झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या वेशभूषेत, नक्ष गंजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.भाग्यदा लक्ष्मी  बा ररम्मा या कन्नड गीतांवर मुली सुंदर नृत्याविष्कार सादर केले. या सजीव देखाव्यांनी भक्त आकर्षित होत होते.ठिकठिकाणी पालखीचे पुष्पवृष्टी करुन स्वागत केले . सदभक्त श्री गुरु पादुकांचे दर्शन घेत होते. आर.एस.पी. व स्काऊट गाईड पथक सहभाग घेतले होते. मिरवणुकीत  विविध विद्या शाखेतील सुमारे २५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या निमित्ताने स्काउट-गाइड पथकातील विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली. नीलम नगर येथील नेताजी शिक्षण संकुलात या मिरवणुकीची सांगता झाली त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. भक्तांच्या दर्शनासाठी पादुका दिवसभर ठेवण्यात आल्या होत्या.यामुळे नेताजी शिक्षण संकुलात जत्रेचे स्वरुप आले होते.
या मिरवणुकीचे होटगीचे राजशेखर फताटे, लेखापरीक्षक महेश आळंगे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर,धानय्या मठपती, संस्थेचे खजिनदार ललिता कुंभार, माजी प्राचार्य विजयकुमार हुल्ले, सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मीकांत त्रिशुले, धर्मराज बळ्ळारी,प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी सहभागी झाले होते. एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोलिसांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अशोक पाटील,राजश्री कोळी, राजशेखर पाटील, जगदेवी रोडगे,हणमंत कुरे, श्रेयस बिराजदार, वैशाली गुजर, शितल चमके, शारदा गिनानी ,विश्वाराध्य मठपती, शिवानंद पुजारी, प्रा. अंगद तोरणे, , शीतल पाटील, चंद्रकांत पाटील,विठ्ठल कुंभार, सूर्यकांत बिराजदार आदींनी परिश्रम घेतले.


Reactions

Post a Comment

0 Comments