पुणे-सोलापूर दरम्यानचा प्रवास होणार सुसाट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 20, 2024

पुणे-सोलापूर दरम्यानचा प्रवास होणार सुसाट

पुणे-सोलापूर दरम्यानचा प्रवास होणार सुसाट  

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  सोलापूर-दौंड दरम्यान रेल्वेगाड्या ताशी १३० किलोमीटर वेगाने येत्या काही दिवसात धावतील. लवकरच याची अंमलबजावणी होणार असून, पुणे-सोलापूर या मार्गावर रेल्वे ताशी १३० धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी दिली. यामुळे पुणे-सोलापूर दरम्यानचा प्रवास सुसाट होणार आहे.

पुणे विभागातून पुणे-दौंड दरम्यान सध्या रेल्वे ताशी १३० किमी वेगाने धावत आहे. यामुळे पुणे-दौंड प्रवास वेगात सुरू आहे. तर सोलापूर विभागातील दौंड-सोलापूर दरम्यान रेल्वे रूळ व इतर पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यांची पाहणी महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी नुकतीच केली. सध्या दौंड-सोलापूर दरम्यान ताशी ११० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे वेळ जास्त लागतो.पुढील काही दिवसात रेल्वेचा वेग वाढणार आहे. त्यामुळे फायदा होणार असून मेल, एक्स्प्रेस आणि डेमू यांचा वेग वाढल्याने प्रवासातील वेळ कमी आहे. त्यामुळे पुण्यातून तीन-साडेतीन तासात सोलापूरला पोहोचणे शक्य होणार आहे. येत्या १५ दिवसात याची अंमलबजावणी होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages