Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजप च्या देवेंद्र कोठे यांच्या विरोधात माकप चे ॲड.अनिल वासम यांची आचार संहिता भंग प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी कडे तक्रार करून गुन्हा नोंदवले

 भाजप च्या देवेंद्र कोठे यांच्या विरोधात माकप चे ॲड.अनिल वासम यांची

 आचार संहिता भंग प्रकरणी निवडणूक

 निर्णय अधिकारी कडे तक्रार करून गुन्हा नोंदवले

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोठे हे आपली उमेदवारी लढवीत आहेत. यादरम्यान उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार करताना त्यांचे प्रचारक  धार्मिक स्थळी सुद्धा जाऊन विना परवाना मतदारांना आवाहन करत प्रचार आहेत. हे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व निवडणूक निर्णय आयोगाच्या आदर्श आचारसंहिते नुसार भंग करणारी बाब आहे. तेव्हा याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी मार्फत नेमण्यात आलेल्या भरारी पथकाकडून या बाबीकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याची तक्रार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ॲड.अनिल वासम यांनी 249 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार दिलेली आहे. त्या अनुषंगाने भरारी पथकाकडून तक्रारीची दखल घेत सखोल चौकशी करून बुधवारी जेलरोड पोलीस ठाणे येथे देवेंद्र कोठे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 223 नुसार  गुन्हा नोंदवण्यात आला. आचार संहिता भंग प्रकरणी योग्य व कायदेशीर कारवाई करण्यास विलंब झाल्यास किंवा कसूर केल्यास न्यालयात धाव घेण्याचे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांचे उमेदवार प्रतिनिधी ॲड अनिल वासम यांनी व्यक्त केले आहे. 

सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आचारसंहिता कक्षाकडे लेखी संबंधित तक्रारीबाबत पुराव्यासह तक्रार दिलेली आहे.या तक्रारीत म्हटले आहे की,गुरुवार दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांच्या प्रचारार्थ पूर्वविभाग श्रीदत्त मंदिर देवस्थान दत्त नगर सोलापूर येथे उमेदवाराचे प्रचारक माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, धनश्री कोंड्याल यांनी विना परवाना धार्मिक स्थळ असणारे श्रीदत्त मंदिर येथे म्हणाल्या कि, सर्वांना नमस्कार, आज २४९, सोलापूर मध्य विधान सभेचे अधिकृत उमेदवार श्री. देवेंद्र दादा कोठे आपणा सर्वांचे लाडके भाऊ उमेदवारला उभारलेले आहेत. सर्वानी कमळ या चिन्हा बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावी, हि विनंती करते. सर्वाना माहिती आहे कि,भाजपालाचा मतदान का करावे ?आज आपण मंदिरात आलेले आहोत. आपल्या मंदिरातले देव सुरक्षित ठेवण्यासाठी आपण भाजपला मतदान कराव. असे विनंती करते. अशा प्रकारे मंदिरात प्रचार केलेला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments