बेगमपूर ते वैराग हा ४९५ कोटी निधीचा रस्ता मंजूर केला
-अजिंक्यराणा पाटील
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-विरोधकांच्या व्यासपीठावर बोलणाऱ्या व्यक्तींनी इसार घेतला आहे. त्यांच्याकडे विकासाचा काय अजेंडा आहे सहा महिन्याच्यावर माणूस टिकत नाही. उमेदवाराला जर विचारल मोहोळ तालुक्यात देगाव कोणत्या दिशेला आहे, तर तेही त्यांना सांगता येणार नाही. पाच वर्षांतून यायचं राजन पाटलांवर बोलायचं निवडणूक झाली, की निघून जायचं हे त्यांचं काम आहे. विकासाच्या काय बोलत बाबतीत नाहीत. आपल्या भागाच दळण वळण वाढण्यासाठी बेगमपूर ते वैराग हा ४९५ कोटी निधीचा रस्ता मंजूर केला आहे. तालुक्याचा उर्वरित विकास पुढील येणाऱ्या काळात करणार असल्याचे प्रसंगी बोलताना सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी सांगितले. मोहोळ तालुक्यातील देगाव (वा.) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महायुतीचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारार्थ मंगळवारी कॉर्नर सभा मंगळवार दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजता झाली. प्रसंगी मनसेचे तेजस आतकरे यांनी देगाव येथील सभेमध्ये महायुतीचे उमेदवार यशवंत माने यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी सीना भोगावती जोड़कालवा, सीना नदीवर बॅरेज बंधारे मंजूर केले. त्याप्रमाणे भोगावती नदीवर बॅरेज बंधारे मंजूर करावे अशी मागणी देगाव (वा.) येथील ग्रामस्थांनी केली. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments