अक्कलकोट विधानसभेसाठी आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव जाहीर होताच प्रचाराचा शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 23, 2024

अक्कलकोट विधानसभेसाठी आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव जाहीर होताच प्रचाराचा शुभारंभ

 अक्कलकोट विधानसभेसाठी आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव जाहीर होताच प्रचाराचा शुभारंभ


अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- रविवारी दुपारी महायुतीकडून अक्कलकोट विधानसभेसाठी आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव जाहीर होताच सोमवारी सकाळपासून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.सर्वप्रथम श्री स्वामी समर्थांचे त्यांनी प्रचाराचा दर्शन घेत श्रीगणेशा केला.यानंतर ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर, समाधी मठ, शेख नुरद्दीनवावा दर्गा,वागदरीचे श्री परमेश्वर मंदिर,जेऊरचे काशी विश्वेश्वर, कुंभारीचे गेनसिध्द मंदिर, हैद्रा येथील ख्वाजा सैपन मुलूक चिस्ती दर्गा, मैंदर्गीचे शिवचलेश्वर मंदिर, दुधनीचे सिध्देश्वर मंदिर, सोलापूर येथील शिवयोगी सिध्दरामेश्वरांचे मंदिर तसेच नागणसूर येथील दोन्ही मठात जाऊन महास्वामींचे दर्शन घेतले.या दौऱ्यात त्यांच्यासोवत भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, सागर कल्याणशेट्टी,अंकुश चौगुले, सुनील कळके, महादेव पाटील, पंकज पाटील, रामचंद्र होनराव, प्रदीप पाटील,सुनील सावंत, प्रदीप जगताप,श्रीशैल ठोंवरे, राजकुमार नागुरे,अप्पू विराजदार, अप्पू परमशेट्टी,सुरेश नागरे, आप्पासाहेव पाटील, राजू हिप्परगी, प्रशांत लोकापुरे,सुनील गोरे, शिवराज स्वामी,सिध्देश्वर मठपती, नन्नू कोरवू,रशीद खिस्तके आदींची उपस्थिती होती. अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री सदगुरू स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेऊन आजपासून प्रचाराला शुभारंभ केला.अक्कलकोटचा हा विकासरथ पुढे नेण्यासाठी वळ द्यावे, अशी प्रार्थना स्वामी महाराजांना केली.याप्रसंगी देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आलेले स्वागत स्वीकारले. यावेळी महायुतीतील घटकपक्षांचे पदाधिकारी माझ्यासमवेत उपस्थित होते, असे आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. या दौऱ्यात आ.कल्याणशेट्टी यांचे गावोगावी भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतपवाजी करत जल्लोपात स्वागत केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages