बेशिस्त रिक्षाचालकांमुळे त्रस्त,रिक्षाचालकांवर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 23, 2024

बेशिस्त रिक्षाचालकांमुळे त्रस्त,रिक्षाचालकांवर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी

बेशिस्त रिक्षाचालकांमुळे त्रस्त,रिक्षाचालकांवर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी



 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- खरेदीसाठी येणारे नागरिक आणि विविध वस्तूंची विक्री करणारे चाटी गल्लीतील व्यापारी बेशिस्त रिक्षाचालकांमुळे त्रस्त झाले आहेत. या रिक्षाचालकांवर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. चाटी गल्ली हे शहरातील व्यापारी पेठांमधील प्रमुख ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे.चाटी गल्ली येथे दिवसभर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची प्रचंड मोठी गर्दी असते. शेजारीच असलेल्या कुंभार वेस, सराफ कट्टा, टिळक चौकातील गर्दीची यात भर पडते.ग्राहकांना विनाव्यत्यय बाजारात खरेदीसाठी आलेल्या खरेदी करता येणे अपेक्षित असते.परंतु, चाटी गल्लीत बेशिस्त रिक्षाचालकांमुळे ग्राहकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.प्रवाशांना सोडायला आलेले बहुतांश रिक्षाचालक आपल्या रिक्षा रस्त्याच्याकडेला न लावता रस्त्याच्या मधोमध लावतात.परिणामी,चाटी गल्लीमध्ये वारंवार वाहतुकीचा खोळंबा होतो. चाटी गल्लीमधील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. त्यामुळे खरेदीसाठी आलेले ग्राहक,व्यापारी यांना प्रचंड त्रास होतो.रिक्षाचालकांना नागरिकांनी,ग्राहकांनी हटकले असता रिक्षाचालकांकडून अर्वाच्य भाषा वापरून ग्राहकांना त्रास दिला जातो.बेशिस्त रिक्षाचालकांवर कठोर कारवाईचा बडगा उचलला तरच ग्राहकांना नाहक होणारा त्रास कमी होणार आहे. चाटी गल्लीतील व्यापाऱ्यांकडे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना दुचाकी नेण्यासाठीही जागा मिळू नये इतक्या बेशिस्तपणे रिक्षा व्यापारी पेठेमध्ये लावल्या जातात. यामुळे चाटी गल्ली परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.काही दिवसातच सण, समारंभ,लग्नसराई सुरू होणार आहे.या काळात चाटी गल्ली आणि परिसरात ग्राहकांची प्रचंड मोठी गर्दी असणार आहे. अशावेळी नागरिकांना रिक्षाचालकांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.पोलीस प्रशासनाने वाहतूक पोलिसांचे फिरते पथक चाटी केल्यास चाटी गल्लीतील वाहतुकीला शिस्त लागण्यास मोठी मदत होणार आहे.  संपूर्ण शहरातील वाहतुकीला शिस्त लावणारे पोलीस प्रशासन सोलापूरच्या बाजारपेठेचा कणा असलेल्या चाटी गल्ली परिसरातील वाहतुकीला कधी शिस्त लावणार ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages