टेंभुर्णी येथील पुरातन जय भवानी माता मंदीरात शारदिय नवरात्रोत्सवास प्रारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 8, 2021

टेंभुर्णी येथील पुरातन जय भवानी माता मंदीरात शारदिय नवरात्रोत्सवास प्रारंभ

 टेंभुर्णी येथील पुरातन जय भवानी माता मंदीरात शारदिय नवरात्रोत्सवास प्रारंभ




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा  तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग सोलापूर पुणे  लगत असलेल्या टेंभुर्णी  येथील 'क ' वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेल्या पुरातन जय भवानी माता मंदीरात शारदिय   नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून मंदिरातील देवीची पूजा व घटस्थापना विधिवत पुजा करून टेंभुर्णीचे विद्यमान सरपंच प्रमोद कुटे व सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोरख देशमुख यांचे हस्ते जय भवानी माता मंदिर ट्रस्टचे आध्यक्ष  सोपान ढगे, उपाध्यक्ष वसंत ढगे  यांचे उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली.माढा  तालुक्यातील  टेंभुर्णी  येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भवानी नगर येथील भवानी माता मंदीरात  सालाबादाप्रमाणे  शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त मंदिर व परीसरात विद्युत रोषणाई व साफ सफाई करण्यात आली आहे. मंदीराला टेंभुर्णी  येथील भाविक सुनिल आळंदे यांनी दरवर्षी प्रमाणे स्वखर्चाने रंगरंगोटी करुन दिली आहे.नवरात्रीच्या कालावधीत मंदीरात पहाटे व सायंकाळी आरती करण्यात येते.चालू वर्षी कोरोनाचे पार्श्वभूमीवर शासनाने दिलेले सर्व नियमांचे पालन करुन नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती भवानी माता मंदीर ट्रस्टचे आध्यक्ष सोपान ढगे यांनी सांगितले.भाविकांच्य सुविधांसाठी ट्रस्टचे अध्यक्ष सोपान ढगे,उपाध्यक्ष वसंत ढगे, खजीनदार व माजी सरपंच दत्तात्रय देवकर, सचिव अनंता कुटे, माजी सरपंच प्रतिनिधी परमेश्वर खरात, तुकाराम ढगे , विलास सावंत  राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अमोल डोईफोडे सुनिल आळंदे दत्तात्रय सावंत सामाजिक कार्यकर्ते भास्कर सोनवणे  राजु बागडे खंडू गोरे भवानी मातेचे पुजारी मधुकर मोकाशी,संदिप मोकाशी यांचेसह आनेक तरुण   परीश्रम घेत  आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages