सुरज देशमुख यांनी घेतली शरद पवार यांची भेट कोणाच्या नावाची शिफारस केली याबाबत तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी-आज मुंबई येथील वाय.बी.चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट युवक नेते सुरज भैय्या देशमुख यांनी घेतली. तसेच त्यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमांचा कार्यअहवाल यावेळी पवार साहेबांना दिला.मुंबई येथे अनेक इच्छुक सध्या पवारांची भेट घेत असतानाच सुरज देशमुख यांना आपला व्यस्त वेळ पवार साहेब यांनी देऊन माढा विधानसभा मतदारसंघातील आढावा जाणून घेतला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून माढा विधानसभा मतदारसंघात तुतारीकडून कोण उमेदवार असेल यांची चर्चा जनतेतून होत असतानाच माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीत सिंह शिंदे तसेच अभिजीत पाटील व नुकतेच दोन दिवसात चर्चेला उधाण आलेले रणजीत सिंह मोहिते पाटील यापैकी कुणाला तुतारी मिळते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून याबाबत सुरज देशमुख यांनी कोणाचे नाव सुचवले हे मात्र अद्याप कळू शकले नाही. पण उमेदवारीचा निर्णय आता पवार साहेब यांच्याकडे येऊन ठेपला आहे. सुरज देशमुख यांनी घेतलेली ही भेट अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. नाना-भैय्या युवा मंचाच्या माध्यमातून त्यांनी काढलेल्या भव्य युवा सन्मान रॅलीचे कौतुक पवार साहेबांनी स्वतःच्या गाड्यांचा ताफा थांबवून केले होते. सुरज देशमुख यांनी माढा विधानसभा क्षेत्रामध्ये नाना-भैय्या युवा मंचाच्या माध्यमातून मोठा युवक वर्ग संघटित केला आहे. सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमामुळे त्यांचे नाव जिल्ह्याभरात पोहोचले आहे. आजच्या भेटीने पुन्हा एकदा माढा विधानसभा मतदारसंघात नव्या चर्चेस उधाण आले आहे. याभेटी प्रसंगी आपण शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार,पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे सोशल मिडीयाच्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले असले तरी पवार साहेबांना माढा तालुक्यातून कोणाचे नाव सुचवले असेल याबाबत तालुक्यात उलट सुलट चर होत आहे.
0 Comments