सोलापूरचे पाच खेळाडू महाराष्ट्र खो-खो संघात, उमाकांत गायकवाड सहायक प्रशिक्षक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 4, 2023

सोलापूरचे पाच खेळाडू महाराष्ट्र खो-खो संघात, उमाकांत गायकवाड सहायक प्रशिक्षक

 सोलापूरचे पाच खेळाडू महाराष्ट्र खो-खो संघात, उमाकांत गायकवाड सहायक प्रशिक्षक



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील पाच खेळाडूंची महाराष्ट्राच्या किशोर खो-खो संघात निवड झाली आहे. कर्नाटकात १३ ते १७ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हे सहभागी होतील.

चिंचणी (पालघर) येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतून त्यांची निवड झाली आहे. तसेच किशोर संघाच्या  सहाय्यक प्रशिक्षकपदी येथील उमाकांत गायकवाड  यांची  निवड झाली. त्यांचे सोलापूर सोलापूर ॲम्युचर खोखो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, पदाधिकारी व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.

निवड झालेले खेळाडू :  अनुष्का विनोद पवार (अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ, वेळापूर) स्नेहा अनील लमकाने, समृध्दी पांडुरंग सुरवसे,

कल्याणी सुनील लामकाने (कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लब वाडीकुरोली, पंढरपूर), संस्कार अशोक शिंदे (आदर्श क्रीडा मंडळ शेवते, पंढरपूर).

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages