सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने वैराग येथे चार डिसेंबरला साखळी उपोषण....!
वैराग शहर आणि तालुक्यातील तमाम मराठा बांधव चक्री उपोषणात सक्रिय होणार....!!
वैराग (कटू सत्य वृत्त): -आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार, त्यासाठी आम्ही आता दंड आणि मांड्या थोपटल्या असून आता सरकारला सुट्टी नाही. 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण दिले नाही तर गाठ मराठ्यांशी आहे. असा सज्जड इशारा मराठा आरक्षण नेते तथा मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील यांनी जालना येथील ऐतिहासिक सभेत सरकारला दिल्यानंतर राज्यातील मराठा समाज बांधव पुन्हा एकदा संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी बार्शी तालुक्यातील वैराग शहर आणि तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने वैराग पोलीस निरीक्षक यांना 4 डिसेंबर पासून चक्री उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदन दिले आहे.
या चक्री उपोषणामध्ये डॉ.कपिल बाळासाहेब कोरके ,अरुण सावंत मेंबर, आंबेगावचे सरपंच सुशील दळवे, वैराग पंचायत समितीचे माजी सभापती मकरंद निंबाळकर, सुर्डी सरपंच विनायक डोईफोडे, तडवळे चे माजी सरपंच बाळासाहेब आवारे, समाधान गुंड ,आनंद कोरके, सुभाष सुरवसे, परमेश्वर पौळ ,संदीप पाटील, बाळासाहेब मोरे, आयुब पठाण, रामचंद्र भालशंकर ,दादासाहेब लोखंडे, धनराज आवारे, सचिन ताटे, हरिश्चंद्र पाैळ,समाधान पवार,मनोज वाघमारे, नंदकुमार पांढरमिशे, शुभम सावंत ,आनंद डुरे या बांधवांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी साखळी उपोषण करण्याचा निर्धार केलाय.
मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी संपूर्ण राज्यभर मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील दिवस आणि रात्र याचा विचार न करता सभा घेऊन समाजाच्या व्यथा जाणून घेत आहेत. मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील यांना राज्यभरातील कोट्यावधी मराठ्यांनी आणि इतर समाजातील बांधवांनी न भूतो न भविष्यती अशी खंबीर साथ दिल्यामुळे मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे.
समाजाने मला काय दिले .यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो .हीच स्वच्छ आणि पारदर्शक विचारधारा घेऊन आपल्या सर्वस्वाचा त्याग करून मनोज जरांगे पाटील लढत आहेत. त्यांना आपणही देणे लागतो याच सर्वांगीण भूमिकेतून वैराग शहर आणि तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांना समर्थन देण्यासाठी चार डिसेंबरला साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तरी वैराग शहर आणि तालुक्यातील तमाम मराठा आणि इतर समाजातील बांधवांनी सुद्धा मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी या साखळी उपोषण मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments