शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी जोडीने बजावला मतदानाचा हक्क
अकलूज (कटूसत्य वृत्त):-तत्कालीन अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी,अकलूज नगरपरिषद निवडणूक मतदानाचा हक्क जोडीने बजावून, नागरिकांना मतदान करण्याचा संदेश दिला.
अकलूज नगरपरिषदेची स्थापना 03/08/2021 रोजी मोठ्या संघर्षातून झाली.सर्व मोहिते पाटील कुटुंब यांच्यासह अकलूज करांनी,अकलूज ग्रामपंचायतीचे रुपांतर, अकलूज नगरपरिषद मध्ये व्हावे म्हणून साखळी उपोषण सुरू केले आणि या त्यांच्या अभूतपूर्व संघर्षाला यश आले.आणि अकलूज ग्रामपंचायतीचे,अकलूज नगरपरिषद मध्ये रुपांतर झाले.
तीन चार वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षा नंतर अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आणि 02/12/2025 रोजी अकलूज - माळेवाडीच्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला,तर जोडीने अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावत नागरिकांना मतदान करण्याचा संदेश दिला.

0 Comments