Hot Posts

6/recent/ticker-posts

सचिन जगताप यांचा वांगी येथे जंगी सत्कार

 सचिन जगताप यांचा वांगी येथे जंगी सत्कार




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- संभाजी ब्रिगेडच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नुकतीच निवड झाल्याने. सचिन बापू जगताप यांची निवड ही संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर वांगी नं. ३ येथे जगताप यांचा जंगी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला पाहिजे तशी गर्दी केली.

कार्यक्रमास जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून जगताप यांच्या कार्याची दखल घेत स्तुतिसुमने अर्पण केली. यामध्ये शिवश्री गणेश सव्वासे (जिल्हा सचिव), शंकर पोळ (जिल्हा उपाध्यक्ष), अमित घोगरे (तालुकाध्यक्ष करमाळा), अजय गायकवाड (तालुकाध्यक्ष-कार्यवाह), तसेच संभाजी ब्रिगेड वाहतूक आघाडीचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी कदम यांचा समावेश होता. वैभव कांबळे, प्रतीक कांबळे, ऋतिक कांबळे, श्रीधर चौधरी, विजय चोपडे यांसह विविध कार्यकर्त्यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.

पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात बोलताना जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
त्यांनी नमूद केले की,
“संभाजी ब्रिगेडचे संघटन बळकट करण्यासाठी आणि शिवचरित्रावर आधारित विचारप्रवाह जनमानसात पोहोचवण्यासाठी जगताप यांचे नेतृत्व मोलाचे ठरणार आहे.”
तसेच, “पश्चिम महाराष्ट्रात सामाजिक भान वाढवणारे, इतिहास संवर्धन करणारे आणि युवकांना दिशा देणारे उपक्रम आता आणखी गतीने राबवले जातील,” असेही ते म्हणाले.

आपल्या मनोगतात सचिन बापू जगताप यांनी संघटनेचा विस्तार आणि सामाजिक प्रश्नांवरील प्रभावी काम ही आपली प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले.
“युवकांना एकत्र आणून विकासाभिमुख उपक्रम राबवण्यात संघटना सातत्याने पुढे राहील. समाजहिताची प्रत्येक चळवळ दृढनिश्चयाने पुढे नेऊ,” असे ते म्हणाले.

यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते जगताप यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Reactions

Post a Comment

0 Comments