लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) महानगरपालिका निवडणूक लढविणार; राज्य कार्यकारिणी बैठकीत महत्त्वाचे ठराव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) आगामी महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या तयारीत असून, एनडीए आघाडीत सन्मानपूर्वक जागावाटप न झाल्यास स्वतंत्रपणे काही जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला. ही बैठक रविवार, 30 नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडली.
बैठकीची अध्यक्षता प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांनी केली. तरराष्ट्रीय उपाध्यक्ष शमीम हवा यांच्या विशेष उपस्थितीत संपूर्ण राज्यातून जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.
बैठकीपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पक्षाचे संस्थापक दिवंगत पद्मभूषण रामविलास पासवान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीला प्रारंभ झाला. यावेळी प्रदेश महासचिव प्रा. अशोक गायकवाड, जिल्हाध्यक्ष प्रमोद भालेकर, शहराध्यक्ष महेश काळोखे, पदाधिकारी सचिन कांबळे, प्रा. चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते.
राज्य कार्यकारिणी बैठकीत जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्यांचा सविस्तर आढावा सादर करून संघटन मजबुतीसाठी सूचना मांडल्या. बैठकीच्या दरम्यान काही नवीन कार्यकर्त्यांनी लोक जनशक्ती पार्टीत प्रवेश करून पक्षाला बळ दिले.
बैठकीत चर्चा करताना प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांनी स्पष्ट केले की, “एनडीएमध्ये सन्मानाने जागा वाटप झाल्यास आघाडीतून लढू; अन्यथा काही जागांवर पक्ष स्वतंत्रपणे उमेदवार उभे करेल.”
बैठकीत प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांनी पुढील महत्त्वाचे ठराव मांडले. सर्व ठराव पदाधिकाऱ्यांच्या टाळ्यांच्या गजरात मंजूर झाले. बिहारमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मिळवलेले यश अभिमानास्पद असून त्यांना अभिमानपूर्वक अभिनंदनाचा ठराव पारित. राष्ट्रीय उपाध्यक्ष शमीम हावा यांना राज्यसभेवर संधी देण्यासाठी राष्ट्रीय नेतृत्वाला मागणी करण्याचा ठराव. ६ डिसेंबरपूर्वी दादर स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी स्टेशन करण्याची मागणी;
अन्यथा ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सही अभियान राबवण्याचा निर्णय. ज्या कोणत्याही सदस्याने शिस्तभंग केला तर त्वरित कारवाई करण्याचा ठराव. अद्याप कार्यकारिणी यादी न दिलेल्या जिल्हाध्यक्षांनी तातडीने राज्य कार्यालयाकडे यादी पाठवावी, अन्यथा कारवाईचा इशारा.
बैठकीच्या अखेरीस राष्ट्रीय उपाध्यक्ष शमीम हवा व प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीचे सूत्रसंचालन प्रदेश महासचिव प्रा. अशोक गायकवाड यांनी केले, तर आभार सचिव प्रशांत ननवरे यांनी मानले.

0 Comments