Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळमध्ये राजकीय तणाव वाढीची शक्यता; नागरिक व पदाधिकाऱ्यांकडून उमेश पाटील यांच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी

 मोहोळमध्ये राजकीय तणाव वाढीची शक्यता; 

नागरिक व पदाधिकाऱ्यांकडून उमेश पाटील यांच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यात वाढत्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर काही नागरिक व स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून उमेश पाटील यांच्या सोशल मीडिया व इतर माध्यमातील वक्तव्यांबाबत सखोल चौकशी व कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

निवेदनकर्त्यांनी आरोप केला आहे की, उमेश पाटील यांनी मागील काही काळापासून वादग्रस्त, प्रक्षोभक व तथ्यहीन विधाने करून तालुक्यातील शांतता बिघडविण्याचा आणि कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम घडविण्याचा धोका निर्माण केला आहे. त्यांच्या मते, पाटील यांची विधाने सातत्याने माध्यमांत येत असून त्यातून स्थानिक नेते, पक्ष आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्याविरुद्ध बदनामीजनक वातावरण निर्माण होत आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.



तक्रारदारांनी पुढे नमूद केले आहे की, सोशल मीडियाचा वापर सर्वसामान्यांच्या प्रबोधनासाठी होत असताना, पाटील यांच्याकडून त्याचा वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी गैरवापर होत असल्याचा दावा केला आहे. तसेच, न्यायालयीन व प्रशासकीय निर्णयांविरुद्ध दिशाभूल करणारी माहिती पसरवून प्रशासनाबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

निवेदनामध्ये असेही म्हटले आहे की, कोणतेही लोकनियुक्त पद नसतानाही अधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष राजकीय दबाव आणण्याचे प्रकार होत असल्यामुळे मोहोळ तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.



तालुका अनेक वर्षांपासून शांततापूर्ण राजकीय वातावरणासाठी ओळखला जातो; परंतु अशा बेताल विधानांमुळे विकास प्रक्रियेलाही बाधा पोहोचू शकते, असे मत निवेदनकर्त्यांनी व्यक्त केले. तसेच, पाटील यांची ही भूमिकाच त्यांच्या पूर्वीच्या सहकारी राजकीय गटांमध्येही नाराजीचे कारण ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रशासनाने सोशल मीडियावरील सर्व वक्तव्यांची तपासणी करून आवश्यक ती कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे एकमुखाने करण्यात आली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments