अल्पवयीन मुलीवर अत्याचार दोघांना अटक, पोलीसांकडून नातेपुते शहरात आरोपीची धींड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 23, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचार दोघांना अटक, पोलीसांकडून नातेपुते शहरात आरोपीची धींड

 अल्पवयीन मुलीवर अत्याचार दोघांना अटक, पोलीसांकडून नातेपुते शहरात आरोपीची धींड




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी नातेपुते पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणात पोलिसांनी नवनाथ कर्चे आणि नारायण खांडेकर मुख्य दोन आरोपींना काही तासांत बेड्या ठोकून नातेपुते शहरातील भरस्त्यात आरोपींची धिंड काढली.
मिळालेल्या माहितीनुसार दोघा आरोपींनी पीडित मुलीचे वय अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या गंभीर प्रकारानंतर पीडितेच्या तक्रारीवरून नातेपुते पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता अकलूज उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली, नातेपुते पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर आणि त्यांच्या विशेष तपास पथकाने तातडीने सूत्रे हलवली. पोलिस पथकाने शोध घेत दोन्ही आरोपींना काही तासाच्या आतच पकडून गजाआड केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर करीत आहेत.

चौकटीत :
अत्याचार प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर नातेपुते पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी आरोपींची नातेपुते शहराच्या भररस्त्यात धींड काढली. नातेपुते पोलीस प्रशासनाचा या ॲक्शन मोड मधून गुन्हेगारावर वचक बसण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. खबरदार कायदा हाती घेतला तर तुमची ही अशीच धींड काढण्यात येईल असा पोलीसी खाकीचा दमच नातेपुते पोलिसांकडून देण्यात आला आहे. नातेपुते शहरातील नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या या कृतीचे स्वागत केले असून यामुळे गुन्हेगारीला व गुन्हेगारी वृत्तीला आळा बसणार आहे असे म्हटले आहे.

फोटो : सपोनि विशाल वायकर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages