अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते पै. कु.धरती बनसोडे हिचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 23, 2026

अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते पै. कु.धरती बनसोडे हिचा सत्कार

 अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते पै. कु.धरती बनसोडे हिचा सत्कार






अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील सदलापूरची कन्या व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे  कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले पैलवान ग्रुपची पै. धरती बनसोडे ही राजस्थान मधील उदयपुर येथील अखिल भारतीय अग्निशमन सेवा कुस्ती स्पर्धा व मुंबई शहर उपनगर खासदार केसरी ची मानकरी ठरली आहे.

या स्पर्धेत ०२ रौप्यपदक, ०१ कांस्यपदक व मुंबई शहर उपनगर खासदार केसरीची मानकरी ठरल्याबद्दल  अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते पै. कु.धरती बनसोडे हिचा सत्कार करण्यात  आला.

याप्रसंगी न्यासाचे पुरोहित विश्वंभर पुजारी, मैनुद्दीन कोरबू, अतिश पवार, निखील पाटील, सर्फराज शेख, सुहास सुरवसे, विराज माणिकशेट्टी, मल्लेशप्पा बनसोडे, दत्ता माने, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, महांतेश स्वामी, शिव स्वामी, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages