देशाच्या जागतिक प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाच्या निषेधार्थ आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 23, 2026

देशाच्या जागतिक प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाच्या निषेधार्थ आंदोलन

देशाच्या जागतिक प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाच्या निषेधार्थ आंदोलन 




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) समिटच्या पार्श्वभूमीवर देशाच्या जागतिक प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या विरोधी आंदोलनाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष अक्कलकोट यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
भारत हा वेगाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करणारा देश असून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात मोठी प्रगती साधण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या समिटचे उद्दिष्ट भारताला जागतिक स्तरावर AI तंत्रज्ञानात अग्रगण्य बनवणे तसेच परदेशी गुंतवणूक, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान भागीदारी वाढवणे हे होते.
मात्र या महत्त्वपूर्ण कार्यक्रमादरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चुकीचा संदेश जाण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम होण्याबरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेची आणि स्टार्टअप क्षेत्राची प्रतिमा धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
आज अमेरिका आणि चीन यांच्यानंतर AI क्षेत्रात भारतानेही आघाडी घ्यावी यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ठोस पावले उचलली जात आहेत. अशा राष्ट्रीय प्रगतीशी संबंधित उपक्रमांना देशांतर्गत राजकीय स्वार्थातून विरोध करणे ही अत्यंत निंदनीय व दुर्दैवी बाब असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
भारतीय जनता पक्ष अक्कलकोटच्या वतीने देशहिताच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेत पुढेही अशा प्रकारच्या राष्ट्रविरोधी कृत्यांचा निषेध करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages