मंगळवेढा तालुक्यात लिंगीरा ओढ्यात पाणी सोडले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 23, 2026

मंगळवेढा तालुक्यात लिंगीरा ओढ्यात पाणी सोडले

मंगळवेढा तालुक्यात लिंगीरा ओढ्यात पाणी सोडले



 शेतकरी व पशुधनासाठी मोठा दिलासा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- खासदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीमुळे, मंगळवेढा तालुक्यातील नागरिक, शेतकरी व पशुधनासाठी दिलासा देणारी महत्त्वाची कारवाई जलसंपदा विभागाकडून करण्यात आली आहे. तीव्र उन्हाळा आणि वाढती पाणीटंचाई लक्षात घेता, मंगळवेढा तालुका येथील उजनी उजवा कालवा (१०८ किमी) डोंगरगाव SKP मधून लिंगीरा ओढ्यात पाणी सोडण्यात आले आहे.

लिंगीरा ओढ्यावर अवलंबून असलेल्या अनेक शेतकऱ्यांना तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता भासत होती. ओढ्यात पाणी नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गंभीर परिस्थिती ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

ऐन उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी मा. अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, सोलापूर यांच्याकडे निवेदन सादर करत तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती. या निवेदनात उजनी उजवा कालवा (१०८ किमी) डोंगरगाव तालुका मंगळवेढा SKP मधून लिंगीरा ओढ्यावरील सिमेंट बंधारे भरण्यासाठी त्वरित पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. पाणी न सोडल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

या मागणीची तात्काळ दखल घेत जलसंपदा विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देत लिंगीरा ओढ्यात पाणी सोडण्याची कार्यवाही केली. पाणी सोडण्यात आल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरत असून, खासदार प्रणिती शिंदे यांच्या तत्पर पाठपुराव्यामुळेच ही समस्या मार्गी लागल्याची प्रतिक्रिया डॉ. नंदकिशोर शिंदे व स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages