सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 23, 2026

सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी

 सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी




अकलूज (कटूसत्य वृत्त):- हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त,अकलूज येथील सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी करण्यात आली.तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित महिलांनी अभिवादन केले.
      सदरचा कार्यक्रम सम्राट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत भोसले व अध्यक्ष कोमलताई शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.
   यावेळी जया कांबळे,पूजा वाघमारे,तमन्ना पठाण,हिना नदाफ, मुमताज बागवान,वनिता शेंडगे, आसावरी खंडागळे,संगीता कांबळे,लता माने,कोमल मोरे, रूबीना बागवान,प्रीती पोळ,लक्ष्मी कांबळे,भगत ताई, शिवानी अडगळे इत्यादी उपस्थित होत्या.
     यावेळी सम्राट प्रतिष्ठानच्या  अध्यक्ष कोमलताई भोसले म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत.त्यांचा पराक्रम आजही प्रेरणादायी आहे. स्त्रियांचा सन्मान आणि प्रजेची सुरक्षितता यावर महाराजांनी अधिक भर दिला. त्यांनी शिस्तबद्ध आणि सक्षम प्रशासन व्यवस्था निर्माण केली. सध्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त 
 सामाजिक कार्यक्रमावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. त्यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्यांच्या विचारांची जयंती साजरी झाली पाहिजे असे त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages