भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिरसट यांना भोसले कुटुंबाचे मोठे पाठबळ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 29, 2025

भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिरसट यांना भोसले कुटुंबाचे मोठे पाठबळ

भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिरसट यांना भोसले कुटुंबाचे मोठे पाठबळ




पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर नगरपालिका निवडणूक सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
जातीच्या नावावर राजकारण करणाऱ्या नेत्यांकडून सदरच्या निवडणुकीकडे ओबीसी विरुद्ध ओपन असा गवगवा केला जात आहे. मात्र पंढरपुर शहरातील राजकारणातील मातब्बर घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोसले कुटुंबातील काही सदस्यांनी भाजपा उमेदवार शामलताई शिरसट यांना पाठिंबा दिल्याने जातीच्या नावावर राजकारण करणाऱ्या नेत्यांना चांगली चपराक बसली आहे.
पंढरपूरच्या राजकारणात माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी जातीपातीचे राजकारण न करता सर्व जाती समूहाला प्रतिनिधित्व देण्याचे काम केले आहे. 
या निवडणुकीतही जातीच्या नाहीतर कामाच्या जोरावर सर्वसामान्य कुटुंबातील शामलताई शिरसट यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस प्रणित तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांच्या माध्यमातून नेत्यांच्या घरातीलच उमेदवार लादण्यात आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
लोकसभा, विधानसभेनंतर राज्यभरात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे कार्यकर्त्यांसाठीच्या निवडणूका म्हणून पाहिले जाते मात्र पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत विधानसभेसाठी उभारणाऱ्या नेत्यांनीच आपल्या घरातील उमेदवार दिल्याने त्यांच्याच गटातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पहावयास मिळत आहे. याबाबत काहींनी तर उमेदवारी अर्ज दाखल करून विरोध दर्शवला होता. मात्र त्यांची मुस्कटदाबी करण्यात आली. याचबरोबर सर्व काही घरातीलच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी  असे धोरण असणाऱ्या नेत्याबाबत त्यांच्याच सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांमध्ये नाराजी दिसून येत आहे. यामुळे जसे जसे निवडणुकीचे मतदान जवळ येईल तसतसे निवडणुकीचे चित्र बदलताना दिसत आहे.

शिरसट यांच्यासाठी भोसले कुटुंब मैदानात

पंढरपूर शहराच्या राजकारणातील मातब्बर घराणे म्हणून ओळखले जाणारे भोसले कुटुंबातील सदस्य भाजपा उमेदवार शामलताई शिरसट यांच्या विजयासाठी मैदान उतरले असून यामध्ये दिपक उर्फ गणपत वसंतराव भोसले, मूकुंद वसंतराव भोसले, हेमंत वसंतराव भोसले, औंदुबर भोसले, शिवतेज भोसले, जयवंत भोसले, डॉ. सागर भोसले, विक्रम भोसले, प्रसाद भोसले, विनायक भोसले, रणविर भोसले, कांतीलाल सूपेकर यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages