अकलूज मध्ये घड्याळाने प्रचाराची दाहकता वाढवली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 29, 2025

अकलूज मध्ये घड्याळाने प्रचाराची दाहकता वाढवली

 अकलूज मध्ये घड्याळाने प्रचाराची दाहकता वाढवली




उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील निवडणुकीच्या रणांगणात 

 
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुळे (अजित पवार गट) प्रचाराची दाहकता वाढली असून,डॉ.धवलसिंह प्रतापसिंह  मोहिते पाटील यांच्या पत्नी सौ. उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील   अकलूज नगरपरिषदेच्या निवडणूक रणांगणात उतरल्यामुळे अखंड राज्याचे लक्ष अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे लागले आहे.
    अकलूज मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेतृत्व डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे करीत आहेत.त्यांनी अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षासह सर्वच प्रभागातून उमेदवार दिले आहेत. 
         महाराष्ट्र राज्याच्या राजकीय सारीपाटावर ज्या कर्तुत्वांन नेतृत्वाने जनविकासाचा आणि जनसेवेचा उत्तुंग डाव जिंकून, स्वतःच्या कर्तुत्वान कार्याचा प्रताप अखंड महाराष्ट्राला दाखवून दिला होता ते  स्व.प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी केलेल्या कार्याला या निवडणुकीच्या प्रचार सभेत नव्याने उजाळा मिळत आहे.
     स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या कर्तुत्वान कार्याचा धागा पकडत, जनसेवेचा आलेख उच्चविद्या विभूषित डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी उंचावत ठेवला आहे.ही त्यांची जमेची बाजू ठरू लागली आहे.
अकलूज नगरपरिषदेची ही निवडणूक काही राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. तर काही पक्षांच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची बनली आहे. काहींसाठी राजकीय भविष्य घडवण्यासाठी बनली आहे, परंतु डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी ही निवडणूक, फक्त जनसेवा आणि जनतेच्या विकासासाठी आहे असे दिसून येत आहे.कारण डॉ.धवलसिंह मोहिते पाटील हे अकलूज येथील शिवापुर पेठेत,प्रचार सभेत म्हणाले होते की,अकलूजचा विकास मागे पडला आहे.सोन्यासारखे गाव अनेक प्रश्नांनी ग्रासले आहे.यामुळे तुतारी आणि भाजपला मत मागण्याचा अधिकार नाही.त्यांच्या या भाषणाने माणसांची मने जिंकली  असले तरी, प्रत्यक्षात ही तिरंगी लढत आहे आणि सर्वच पक्षांच्या प्रचाराची धगही वाढली आहे.या धगीत कितपत कमळ फुलेल? तुतारीचा गोडवा कितपत मंत्रमुग्ध करेल? तर पुन्हा घड्याळाचे आगमन कितपत करामत करेल? हे आता अकलूजच्या जनतेवर अवलंबून आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages