सीना नदीवरील तिऱ्हे–शिंगोली तरटगाव पूल अत्यंत धोकादायक, खा. शिंदे यांची पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 29, 2025

सीना नदीवरील तिऱ्हे–शिंगोली तरटगाव पूल अत्यंत धोकादायक, खा. शिंदे यांची पाहणी

 सीना नदीवरील तिऱ्हे–शिंगोली तरटगाव पूल अत्यंत धोकादायक, खा. शिंदे यांची पाहणी





उत्तर सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे आणि मोहोळ तालुक्यातील शिंगोली–तरटगाव यांना जोडणारा सीना नदीवरील पूरग्रस्त जुना पूल सध्या जीवघेणा ठरत असून गेल्या काही महिन्यांपासून तो पूर्णपणे नादुरुस्त आहे. पूलावरील साईड रोलिंग व संरक्षक पाईप तुटून पडले असून काही भाग नदीच्या पाण्यात वाहून गेले आहेत. पुलावरील खोल खड्ड्यांमुळे सतत अपघात घडत असून वाहतूक धोकादायक झाली आहे.

गेल्या पंधरा दिवसांत या पुलावर तीन मोठे अपघात झाले आहेत. एका व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर झाला, दुसऱ्या अपघातात प्रवासी टमटम पूल ओलांडताना पाण्यात कोसळला आणि चालकाचा जीव थोडक्यात वाचला. आज पुन्हा मोटारसायकलस्वार गंभीर जखमी होऊन पाय बंदी झाला आहे.

या वाढत्या अपघातांबाबत स्थानिक नागरिकांनी खासदार प्रणिती शिंदे यांना कळविल्यानंतर त्यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पुलाची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला.

नागरिकांनी सांगितले की, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पूल अत्यंत जर्जर अवस्थेत असून आठ ते दहा गावांच्या नागरिकांची ये-जा पूर्णपणे या पुलावरच अवलंबून आहे. रस्ता धोकादायक झाल्याने एसटी वाहतूक बंद झाली असून शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नॅशनल हायवे विभाग यांच्या जबाबदारीच्या वादात दुरुस्ती रखडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

खासदार प्रणिती शिंदे यांनी या परिस्थितीची गंभीर दखल घेत तातडीने मा. जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पुलाच्या दुरुस्तीबाबत त्वरित कारवाईची मागणी केली.
यावर तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी नॅशनल हायवे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेऊन पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.

या पाहणीवेळी उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भारत जाधव, मोहोळ तालुका काँग्रेस अध्यक्ष सुलेमान तांबोळी, राजेश पवार, सोमनाथ दावणे, कुंदन दावणे, राजू मोटे, रावसाहेब गायकवाड, महेश गायकवाड, बबलू रासेराव, राहुल भोई, कस्तुरे, चंद्रभान गायकवाड आदी नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages