ग्रंथपालन प्रशिक्षण प्रवेशासाठी आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 29, 2025

ग्रंथपालन प्रशिक्षण प्रवेशासाठी आवाहन

ग्रंथपालन प्रशिक्षण प्रवेशासाठी आवाहन


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने सर्व समावेशक, शाळा, कॉलेज, आश्रमशाळा, सार्वजनिक ग्रंथालय, रेल्वे महामंडळ, कोर्ट, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, खाजगी कंपन्या इत्यादी विभागात ग्रंथपाल, ग्रंथालय सहाय्यक, निर्गम सहाय्यक, ग्रंथालय परिचर आणि विशेष करून आरोग्य विभागात अभिलेखापाल या पदाकरीता रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे नवीन सुधारित सहा महिन्याचे ग्रंथपालन प्रशिक्षणाची निर्मिती केली आहे. सदर प्रशिक्षण हे जानेवारी 2026 ते जून 2026 या कालावधीमध्ये होणार असून या प्रशिक्षणाच्या प्रवेशा करिता इयत्ता बारावी कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रवेशा करिता वयाची अट नाही. या प्रशिक्षणाचे माध्यम मराठी राहणार असून प्रशिक्षणाचे स्थळ : सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर, हुतात्मा स्मारक मार्कंडेय उद्यान, अशोक चौक, पोलीस चौकी समोर, सोलापूर कार्यालय राहणार असून प्रशिक्षणाचे वर्ग दर शनिवारी आणि रविवारी या दोनच दिवशी राहणार आहेत. प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया दररोज सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळात सुरू असून प्रवेशाचा अंतिम दिनांक 25 डिसेंबर 2025 पर्यंत असून प्रवेशा करिता कोणत्याही मूळ (ओरिजनल) शैक्षणिक प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. करिता जिल्ह्यातील सर्व ग्रंथप्रेमी नागरिक त्याचप्रमाणे शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, कर्मचारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. हा अभ्यासक्रम डी. एङ समकक्ष आहे. सदर प्रशिक्षणा करिता प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2025 आहे. प्रवेशाकरिता इयत्ता बारावीची गुणपत्रिका झेरॉक्स, शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स, जातीच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स त्याचप्रमाणे चार पासपोर्ट साईज फोटो इत्यादी आवश्यक राहणार आहेत प्रशिक्षणाच्या प्रवेशा करिता अधिक माहितीसाठी 9404666488 / 7350922276 या भ्रमणध्वनीवर संपर्क करू शकता, असे आवाहन सोलापूर केंद्राचे वर्गव्यवस्थापक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages