बाळे ते जुळे "पर्यंत राष्ट्रवादीचे नगरसेवक मनपात जातील - अण्णा बनसोडे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 29, 2025

बाळे ते जुळे "पर्यंत राष्ट्रवादीचे नगरसेवक मनपात जातील - अण्णा बनसोडे

 बाळे ते जुळे "पर्यंत राष्ट्रवादीचे नगरसेवक मनपात जातील - अण्णा बनसोडे




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गोविंदश्री मंगल कार्यालयातील प्रभाग २४ आणि २६ च्या राष्ट्रवादीच्या बैठक वजा भेटीत आगामी सोलापूर महानगरपालिका जिंकण्याचा निर्धार राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या साक्षीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला.राष्ट्रवादी सोशल मीडियाचे प्रमुख प्रमोद भोसले यांनी या बैठक - भेटीचे आयोजन केले होते. सोलापूर शहरात गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाचे काम मोठ्या जोमाने सुरू आहे सातत्याने अजित दादांच्या पक्षाकडे येण्याचा ओढा अनेकांचा वाढला आहे.जुळे सोलापूर भागामध्ये यंदा कोणत्याही परिस्थितीत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेत जातील, असा विश्वास प्रमोद भोसले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.सर्वांच्यावतीने अण्णा बनसोडे यांचा विशेष सत्कारही करण्यात आला. अण्णा बनसोडे यांनीही या भेटीत उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांना जोमाने कामाला लागण्याच्या सूचना केल्या.केवळ जुळे सोलापूर नव्हे तर "बाळे ते जुळे "इथपर्यंत अजित दादा पवार राष्ट्रवादीचे नगरसेवक महानगरपालिकेत गेले पाहिजेत, असे अण्णा बनसोडे यावेळी बोलताना म्हणाले.
  याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम,जेष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत व्हसुरे
जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले माजी नगरसेविका नूतन गायकवाड,प्रियांका पवार, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages