कसब्यात ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ मोहिमेला सुरुवात
प्रभाग २५ मध्ये सुरू झालेली स्वच्छ प्रभाग मोहीम कसब्याच्या स्वच्छता मिशनला बळ देईल. असा विश्वास कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी व्यक्त केला. मतदारसंघातील सर्वांगीण स्वच्छता आणि विकासाला गती देण्यासाठी आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ९० दिवस’ उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ या मोहिमेचा शुभारंभ आज त्यांच्या शुभहस्ते करण्यात आला. हा उपक्रम राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त हाती घेण्यात आला असून, प्रभाग क्र. २५ मधील स्वच्छता कार्य अधिक प्रभावी, नियमित आणि तातडीने पार पाडण्यासाठी हा संकल्प करण्यात आल्याचे राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांनी सांगितले.
या मोहिमेदरम्यान प्रभागातील विविध भागांत नियमित स्वच्छता करण्यात येणार असून सेवकांकडून ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. तातडीने कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र वाहनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ५ हजार कचरा पेट्यांचे वितरण केले जाणार आहे. परिसरातील क्रॉनिक स्पॉट्सवर जनजागृती करण्यात येणार असून नागरिकांच्या तक्रारीसाठी स्वच्छता हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तिचा क्रमांक 8381 079 079 असा आहे.
या कार्यक्रमामध्ये अंजुताई माने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ‘कचऱ्यात सापडलेली तब्बल 10 लाख रुपये रोखरक्कम असलेली बॅग तिच्या मालकास परत करून प्रामाणिकतेचे उदाहरण घालून दिलेल्या’ पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता सेविका आणि ‘स्वच्छ, सुंदर, विकसित आणि प्रामाणिक कसबा’ उपक्रमाच्या ब्रँड अॅम्बेसिडर अंजुताईंचा रोख 21 हजार रुपयांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रदीप आव्हाड, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक महेंद्र सावंत, आरोग्य निरीक्षक शर्मिला चव्हाण, अतिक सय्यद, नंदकुमार म्हंगरे, तसेच विश्रामबागवाडा आरोग्य कोठी मुकादम राजेंद्र आप्पा मोरे आणि सहाय्यक मुकादम अविनाश आरणे उपस्थित होते. भाजप शहर उपाध्यक्ष मनोज दादा खत्री, भाजप कसबा उत्तर मंडलाचे अध्यक्ष अमितजी कंक, सरचिटणीस निलेशजी कदम व संतोषजी फडतरे, किरणजी जगदाळे, महिला अध्यक्ष मोहनाताई गद्रे, युवा मोर्चा अध्यक्ष श्रेयसजी लेले, भाजप प्रभाग २५ अध्यक्ष सुनीलजी रसाळ, युवा मोर्चा शहर सरचिटणीस प्रणव गंजीवाले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली.
राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी सर्वांचे आभार मानत सांगितले की, नागरिकांच्या सहकार्याने परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार आज करण्यात आला असून, स्वच्छतेच्या माध्यमातून विकासाच्या वाटेने पुढे जाण्याचा मानस आहे.

0 Comments