नेताजी प्रशालेत संविधान दिन व शहीद दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत संविधान दिन व शहीद दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य रविशंकर कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, ज्येष्ठ शिक्षक राजकुमार मरगुरे, संगप्पा दसगोंडे, विजयालक्ष्मी माळवदकर, संगप्पा दसगोंडे यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अशोक कामटे, हेमंत करकरे व शहीद विजय साळसकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.मनिषा चिरमाडे, भूमी मासपत्री, मुजरीन मुल्ला, दर्पण राठोड, सिद्धार्थ पोषम, समृद्धी पेडसिंगे, श्रुती मोरे, आरोही काशीद, अखिल जरबंडी, सार्थक मादगुंडी, आदित्य केशेट्टी, उमा बिटला, सारिका मोतकुर, कावेरी पगड्याल, अक्षया सुंकनपल्ली आदी विद्यार्थ्यांनी संविधान व शहिद दिनाविषयी माहिती सांगितले. संगप्पा दसगोंडे, गणपती पाटील व इरण्णा कलशेट्टी यांच्याकडून प्रत्येकी १०१ रुपये बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद पुजारी यांनी केले तर सिद्धाराम बिराजदार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

0 Comments