मोहोळ शहरात अखेर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला, पोलिस छावणीचे स्वरूप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 23, 2026

मोहोळ शहरात अखेर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला, पोलिस छावणीचे स्वरूप

 मोहोळ शहरात अखेर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला, पोलिस छावणीचे स्वरूप





मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरात विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. माहितीनुसार, काल मध्यरात्री 'शंभूप्रेमीं'कडून मोहोळ एसटी स्टॅन्डसमोरील चौकात पुतळा उभारण्यात आला.

सकाळी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास येताच पुतळा हटविण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या. संबंधित ठिकाणी उभारणीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र पुतळ्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास कोणालाही होत नाही. त्यामुळे प्रशासनाने सदर पुतळ्याबाबत सकारात्मक विचार करून शंभू प्रेमींना सहकार्य करावे. अशी चर्चा इतिहास तज्ञ व विचारवंत यांच्या गोटात चालू आहे.

मात्र पुतळा हटवण्याच्या हालचालींना स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. "हा पुतळा हटवला तर मोहोळ बंद ठेवू," असा इशारा शंभूप्रेमींनी दिला आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पुतळा उभारण्यात आलेल्या एसटी स्टॅन्ड चौकात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. पुतळा पाहण्यासाठी लोकांची सतत वर्दळ सुरू असून वातावरण तणावपूर्ण बनले आहे. संभाव्य वाद टाळण्यासाठी पोलिसांनी पुतळ्याभोवती जाळ्या लावून परिसर बंदिस्त केला आहे.

मोहोळ पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुतळा हटवण्याच्या मुद्द्यावरून पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, प्रशासन याप्रकरणी नेमकी काय भूमिका घेते आणि पुढील निर्णय काय होतो याकडे संपूर्ण मोहोळचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages