ड्रेनेज समस्याची तक्रार प्राप्त होताच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी केली पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 24, 2026

ड्रेनेज समस्याची तक्रार प्राप्त होताच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी केली पाहणी

 ड्रेनेज समस्याची तक्रार प्राप्त होताच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी केली पाहणी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राणा प्रताप नगर परिसरात गंभीर ड्रेनेज समस्या निर्माण झाल्याची तक्रार प्राप्त होताच उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
परिसरात सांडपाणी साचल्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत उपमहापौरांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून ड्रेनेज लाईनची तात्काळ दुरुस्ती करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
“नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. काम तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करावा,” असे ठाम निर्देश त्यांनी दिले.
यावेळी सभागृहनेते नरेंद्र काळे, नगरसेवक राजशेखर पाटील, नगरसेवक सत्यजित वाघमोडे, अक्षय वाकसे, भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष महेश देवकर, उप अभियंता रामचंद्र पेंटर, विभागीय अधिकारी तळीखेडे तसेच कनिष्ठ अभियंता सेफाली मॅडम, ढवळे जेई उपस्थित होते.
राणा प्रताप नगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या. उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले व लवकरच समस्या मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages