चौंडेश्वरवाडी येथे वेलकम मेळावा संपन्न
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील चौडेश्वरवाडी येथे वेलकम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रम सरपंच अलका शिवाजीराव इंगवले-देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बानु सय्यद, बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड, अंगणवाडी सुपरवायझर रिता चव्हाण व अंगणवाडीच्या सर्व सेविका, मदतनीस व बालक पालक उपस्थित होते.
यावेळी स्वागत समारंभा नंतर बालगीते, बडबडगीते खेळ, शिक्षण, पूर्व आरोग्य मार्गदर्शन, तसेच बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी फळे, कडधान्य, पालेभाज्या महत्वाचे असल्याचे सांगण्यात आले. तर अंगणवाडीतील पोषक आहार पुर्व प्राथमिक शिक्षण याविषयी बालविकास प्रकल्प अधिकारी अल्लडवाड, रिता चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी सर्व सेविका व मदतनिस यांनी अधिक परिश्रम घेतले.कार्यक्रम आयोजित करण्यासाठी हिना कौसर, अल्ताफ पठाण,सुमन फुले, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस विद्या अंकुशराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
.png)
No comments:
Post a Comment