नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील नामांकित नागेश करजगी ऑर्किड स्कूल मध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 'श्रीकृष्ण जन्माष्टमी' आणि गोपाळकाला अत्यंत भक्तीमय व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन आणि आरतीने झाली. या प्रसंगी शाळेचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, शाळेच्या मार्गदर्शीका मीना पारखे, प्राचार्या रश्मी कुंभार, आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राचार्यानी विद्यार्थ्यांना संबोधित करताना श्रीकृष्ण जन्माचे महत्त्व, त्यांच्या बाललीला आणि त्यांनी भगवद्गीतेच्या माध्यमातून दिलेला कर्मयोग व जीवन जगण्याचा संदेश अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितला. समाजात एकोपा, बंधुभाव आणि संघभावना टिकवून ठेवणे हीच काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले.याप्रसंगी प्री-प्रायमरी आणि प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाच्या सुंदर आणि आकर्षक पारंपरिक पोशाख परिधान केला होता. बालगोपाळांच्या या मनमोहक रूपामुळे संपूर्ण शाळा परिसर गोकुळनगरीसारखा भासत होता. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित विविध भक्तीगीते आणि मनमोहक नृत्ये सादर केली.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार दादा करजगी, संस्थेच्या सचिवा सौ.वर्षाताई विभुते यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे 'दहीहंडी उत्सव'. शाळेच्या मैदानावर सजवलेली दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. प्राचार्या रश्मी कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत 'गोविंदा रे गोपाळा' च्या गजरात आणि ढोल-ताशांच्या तालावर चिमुकल्या गोविंदांनी मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडली. उपस्थित शिक्षक आणि पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना पोह्यांच्या गोपाळकाल्याचा प्रसाद वाटण्यात आला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे व्यवस्थापन, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
.png)
No comments:
Post a Comment