आडके हॉस्पिटल येथे रशियन इलिझारोव्ह पद्धतीने शस्त्रक्रिया यशस्वी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील आयनापुर येथील एका ३४ वर्षीय युवतीचा रस्त्ये अपघातामध्ये डाव्या पायाचे हाड मोडून मोठी जखम झालेली होती. त्यावर सिकंदराबाद येथील एका मोठ्या इस्पितळामध्ये एक्स्टरनल फिक्सेटर,स्कीन ग्राफ्टिंग व त्यानंतर प्लेटिंग व बोन ग्राफ्टिंग अशा तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या हाडात पू भरून ते हाड जुळले नाही. नंतर कलबुर्गी येथे हाडातील पट्टी काढून टाकण्यात आली. या रुग्णाने पुढील उपचारासाठी मुंबई येथील केइएम हॉस्पिटल व अनेक इतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये विचारणा केली असता अशा अवघड परिस्थितीत तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी कोणीही समर्थता दर्शवली नाही. हा रुग्ण त्यानंतर सातत्याने बिछान्यातच असल्यामुळे तिचा पायाचा पंजा वाकडा झाला होता व अंगातील रक्त कमी होऊन ॲनिमिया झाला होता.
या रुग्णावर आडके हॉस्पिटलचे अस्थिरोग व रशियन इलिझारोव्ह तज्ञ डॉ. संदीप आडके यांनी रशियन इलिझारोव्ह पद्धतीने चिरफाड न करता बाहेरूनच वायर व रिंगांच्या फ्रेमने शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिये नंतर त्याच दिवशी रुग्ण आपल्या शस्त्रक्रिया केलेल्या पायावर वॉकरच्या साह्याने चालू लागला. दीड महिन्यातच हाडांना लागलेले कीड नियंत्रणात आली व वाकडा असलेला पंजा सरळ केला. सात महिन्यांमध्ये न जुळलेले हाड जुळवले .
रुग्णाच्या अंगात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे तिला ॲनिमिया झालेला असताना व आर्थिक दृष्ट्या अतिशय दुर्बल असताना सुद्धा या रुग्णावर अवघड अशी शस्त्रक्रिया अत्यंत कमी खर्चात आडके हॉस्पिटल येथे यशस्वी करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी भूलतज्ञ डॉ. दिनेश रसाळ व डॉ. डायना आडके ,आडके हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांची मदत झाली.
रशियन इलिझारोव्ह पद्धतीने शरीरातील सर्व फ्रॅक्चर्स, न जुळलेली अथवा वाकडी हाडे, हाडांना लागलेली कीड ,पोलिओ, लहान मुलांचे अस्थिरोग, गुडघेदुखी, उंची वाढवणे, कंबर ,मणका, हाताचे व पायाचे अस्थिविकार अशा अनेक असाध्य अस्थिरोगांवर कमी खर्चात व अत्यंत प्रभावीपणे उपचार करणे शक्य आहे. विशेष म्हणजे हे उपचार विना चिरफाड केल्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रुग्णास आपला शस्त्रक्रिया केलेला हात, पाय त्याच दिवसापासून वापरता येतो. अस्थिरोगावरील इलिझारोव्ह हे जगातील अतिशय प्रगत तंत्रज्ञान आडके हॉस्पिटलच्या माध्यमातून आज सर्वसामान्यांना सोलापुरात उपलब्ध झालेले आहे.
.png)
No comments:
Post a Comment