साेलापूर जिल्ह्यातील धरणे होणार आता गाळमुक्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 23, 2026

साेलापूर जिल्ह्यातील धरणे होणार आता गाळमुक्त

साेलापूर जिल्ह्यातील धरणे होणार आता गाळमुक्त


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील २१२ प्रकल्पातून गाळ काढण्यास मंजुरी देण्यात आली होती, त्यापैकी १६५ प्रकल्पातून तीन वर्षात ११६.८६ दशलक्ष घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. गाळमुक्त धरण योजनेचा ८ हजार ६५६ शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून ३ हजार २८० हेक्टर सुपीक झाली आहे तर धरणातील गाळ काढल्याने ११ हजार ६८६ सहस्र घनमीटर इतक्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
जलसंधारण विभागाच्या वतीने जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये ५२, २०२४-२५ मध्ये ८६ तर २०२५-२६ मध्ये २७ प्रकल्पातून गाळ काढण्यात आला आहे. बार्शी तालुक्यातील सर्वाधिक तलावातून गाळ उपसा केला आहे. ६३.७६ लाख घन मीटर गाळ उपसा केल्याने ६ हजार ३७६ सघमी (सहस्त्र घन मीटर) इतका पाणीसाठा वाढला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात १८.५१ लाख घमी गाळ उपसा केल्याने१८५१ सघमी पाणीसाठा वाढला आहे. २१२ पैकी १६५ प्रकल्पातून गाळ उपसा करण्यात आला आहे. उर्वरित ४७ प्रकल्पांत पाणीसाठा असल्याने कामे बंद आहेत. ४७ प्रकल्पांतून १६ लाख ८३ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील २१२ प्रकल्पांतून गाळ उपसा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी १६५ ठिकाणाहून ११६ लाख घन मीटर गाळ उपसा करून ३२८० हेक्टरवर टाकण्यात आला आहे. याचा जिल्ह्यातील ८६५६ शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. यंदाही गाळ काढण्याची मोहीम सुरू राहणार आहे. प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर गाळ उपसा करण्यात येणार आहे.
- राहुल क्षीरसागर, जिल्हा जलसंधारण अधिकारी 


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages