Hot Posts

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन सेनेच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी सिद्राम उर्फ सिद्धार्थ कांबळे यांची निवड....! रिपब्लिकन सेनेचे विचार तळागाळात पोचविणार ...!! सिद्राम कांबळे

 रिपब्लिकन सेनेच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी सिद्राम  उर्फ सिद्धार्थ कांबळे यांची निवड....! 

रिपब्लिकन सेनेचे विचार तळागाळात पोचविणार ...!!  सिद्राम कांबळे 


सोलापूर (कटू सत्य वृत्त): -रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, राज्य सचिव श्रीपती ढोले, उपाध्यक्ष खाजामियाँ पटेल  , प्रदेश प्रवक्ते वसंत कांबळे आणि शेतकरी सेना  नेते मुजीबखान पठाण  यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

ही संविधान बचाव रॅली आंबेडकर उद्यान येथून सुरू होऊन कर्मवीर भाऊराव पाटील सम्राट चौक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला .त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंबेडकर चौक येथे पोहोचल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजा आणि बुद्ध वंदना घेण्यात आली. रॅलीचे सभेत रूपांतर झाले आणि आठ वाजता जाहीर सभेला सुरुवात करण्यात आली. या सभेला शहर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना मान्यवर नेत्यांनी मार्गदर्शन केले. 

त्यानंतर  यात्रेची सांगता झाली .आणि ही यात्रा  दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी मोहोळ मार्गे पंढरपूर सातारा कडे रवाना झाली. ही यात्रा मोहोळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिना पुष्प व मेणबत्ती उदबत्ती अर्पण करून बुद्ध वंदना करून या ठिकाणी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार रिपब्लिकन चे नाव मोहोळ तालुका अध्यक्ष महादेव गाडे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्याच ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी सिद्राम उर्फ सिद्धार्थ महादेव कांबळे यांचे निवड जाहीर करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी कांबळे यांचा सत्कार केला. या सत्कारला उत्तर देताना सिद्राम कांबळे म्हणाले,  "रिपब्लिकन सेनेचे संस्थापक, बौद्धजन पंचायत समितीचे चेअरमन तथा इंदु मिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर लढ्याचे प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली  2009 पासून आज पर्यंत म्हणजेच 14 वर्षापासून रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून सेनेचे विचार तळागाळात पोचविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य केल्यामुळेच मी केलेल्या कार्याची दखल घेऊन माझ्या कार्याची पोचपावती म्हणून डॉ.  बाबासाहेब आंबेडकर  यांच्या अस्थिना साक्ष ठेवून रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारणी मध्ये माझी सदस्य पदी निवड करून मला सन्मानपत्र दिले. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वाडी- वस्त्यावर पक्षाच्या पुनर्बांधणीचे आदेश  दिले असून ही जबाबदारी माझ्या शिरावर सोपवण्यात आली आहे. मिळालेल्या संधीचे मी निश्चितपणे सोने करून दाखवीन.  असे यावेळी बोलताना  सिद्राम कांबळे यांनी सांगितले. 

याप्रसंगी कार्यक्रमास रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीपती ढोले, रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक अमित गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे मीडिया प्रमुख सिद्धांत सूर्यवंशी, संविधान महा रॅलीच्या वाहनाचे चालक शेंडे, सोलापुरातील आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते पोपट सोनवणे, रिपब्लिकन सेनेचे मोहोळ तालुका अध्यक्ष महादेव गाडे, सचिव सोनवणे , शहर उपाध्यक्ष गंगाधर घोडेस्वार, कामगार सेना उपाध्यक्ष राजशेखर चंदनशिवे, माढा तालुका अध्यक्ष मनोज गाडे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष प्रशांत मसलखांब, जिल्हा उपाध्यक्ष संतोष बंडगर, नागेश गेजगे, दक्षिण सोलापूर सचिव सेक दुपारगडे आदी सह कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. 

पुढील काळात रिपब्लिकन सेना सोलापूर शहर जिल्ह्यात पक्षाची पुनर्बांधणी  करण्यात येणार असून ज्या कार्यकर्त्यांना या पक्षात काम करण्याची इच्छा आहे त्यांनी अमित गायकवाड मो: -7558286100 आणि सिद्धार्थ कांबळे मो: - 9503676167 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीने नूतन प्रदेश कार्यकारणी सदस्य सिद्धार्थ कांबळे यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments