वाशिम येथे उद्या दि. 02 डिसेंबर 2023 रोजी संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय मेळावा...
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित राहणार...सचिन जगताप
वाशिम (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रात बेकायदेशीर पद्धतीने निर्माण झालं ट्रिपल इंजिन ढकल स्टार्ट सरकार आरक्षण विरोधी आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, ओबीसी जातनिहाय जनगणना हे प्रश्न गंभीर असताना महाराष्ट्रातल्या सुशिक्षित बेरोजगार व अन्य प्रश्नावर सुद्धा दुर्लक्षित करत आहे. आरोग्याच्या दृष्टीने दुर्घटना पाहता सरकार गंभीर नाही. तरुण पिढी नोकरीविना उद्ध्वस्त होत आहे... या आणि अशा निष्क्रिय सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेड मोठ्या ताकतीन महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरणार आहे. निष्क्रिय शिंदे-फडणवीस-पवार सरकार विरोधात तीव्र आंदोलन करणार आहे.
वाशीम येथील वाटाणे लॉन्स, अकोला नाका, वाशिम अधिवेशनामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने काही 'प्रमुख ठराव' घेण्यात येणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड मोठी घोषणा करणार आहे. आमच्या हक्काचा आम्हाला मिळालं पाहिजे. काही तथाकथित ओबीसी नेते म्हणून घेणारे छगन भुजबळ सारखे लोक मराठा व ओबीसी वाद लावून महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्यांचा संभाजी ब्रिगेड स्टाईलने समाचार भविष्यात घेण्यात येणार आहे या व अशा संविधानिक पद्धतीने आंदोलनाच्या दिशेने संभाजी ब्रिगेड उद्या वाशिम येथे मोठा पाऊल उचलणार आहे. महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेरील संभाजी ब्रिगेडचे हजारो पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक या राज्यस्तरीय मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.
0 Comments