शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ज्वारी-गहू-हरभरा स्पर्धांना उत्साह
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकरी विविध प्रयोगशील तंत्रांचा अवलंब करीत आहेत. अशा नवकल्पनाशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या मनोबलात वाढ करणे आणि त्यांच्या यशस्वी पद्धती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविली जात आहे.
या माध्यमातून शेतकऱ्यांना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर बक्षिसांनी गौरविले जाणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
५ पिकांसाठी रब्बी हंगाम २०२५ मध्ये स्पर्धा
कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम २०२५ साठी सर्वसाधारण आणि आदिवासी गटांत ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पाच पिकांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची अटी:
* शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे आणि ती स्वतः कसत असणे आवश्यक.
* एका शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त पिकांसाठी अर्ज करता येईल.
* संबंधित पिकाची किमान ४० आर सलग लागवड असणे आवश्यक.
* अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख – ३१ डिसेंबर २०२४.
प्रवेश शुल्क व बक्षिसे
✓ प्रवेश शुल्क:-
* सर्वसाधारण गट – ₹३०० प्रति पीक
* आदिवासी गट – ₹१५० प्रति पीक
✓ बक्षिसांचे तपशील:-
तालुका स्तर
* प्रथम – ₹५,०००
* द्वितीय – ₹३,०००
* तृतीय – ₹२,०००
**जिल्हा स्तर**
* प्रथम – ₹१०,000
* द्वितीय – ₹७,000
* तृतीय – ₹५,000
राज्य स्तर
* प्रथम – ₹५०,000
* द्वितीय – ₹४०,000
* तृतीय – ₹३०,000
शेतकऱ्यांना आपले प्रयोग व अनुभव सिद्ध करण्याची ही उत्तम संधी असल्याचे सांगत सोलापूरचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सर्व शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
0 Comments