छत्रपतींच्या विचारांचा वारसा जपा; निर्भयपणे काम करा – श्रीकांत डांगे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनी केले. मेळाव्यात विद्यार्थी संघटनेच्या नव्या निवडी जाहीर करण्यात आल्या. शहरप्रमुखपदी गणेश नागणे यांची निवड झाली. तर उपशहरप्रमुखपदी रोहित वाघमारे, शुभम दासरी, आर्यन घुले, प्रदीप आडम यांची निवड करण्यात आली.
संपर्कप्रमुख नीलेश मोटे, सचिव शुभम खंडागळे, सहसचिव रोहन घुले, तर संघटकपदी आदित्य आडम, समर्थं डोंगरे, सुदर्शन शिवसिंगवाले, विवेक हलसगी यांची निवड झाली. प्रसिद्धीप्रमुखपदी यश कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी अजिंक्य पाटील यांच्यासह नव्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास संघटनेचे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, शहरप्रमुख सागर ढगे, दक्षिण तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे, तसेच सोमनाथ मस्के, अर्जुन शिवसिंगवाले, राज जगताप, द्वारकेश बबलादीकर, राजू रच्चा, प्रदीप मोरे यांच्यासह सोलापूर शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष काळे यांनी केले, तर आभार गिरीश देवकते यांनी मानले.
0 Comments