सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळावा म्हणून कायम प्रयत्नशील--अभिजीत पाटील
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळावा यासाठी मी या जिल्ह्यातील एक शेतकरी पुत्र म्हणून कायम प्रयत्नशील राहणार असून शेतकऱ्यांच्या उसाला भाव देण्याची परिस्थिती असताना साखरेपासून उसापासून चांगला पैसा मिळत असताना जिल्ह्यातील साखर सम्राट ऐनवेळी एक येऊन राजकारणातील हेवेदावे विसरून दरांमध्ये स्पर्धा न करता कमीत कमी बिल कसे देता येईल असा प्रयत्न आज पर्यंत करत होते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मी हेच शेतकऱ्यांना पटवून देत होतो साखरेतून किती पैसे राहतात मळी बघायास प्रेसमड इथेनॉल को जनरेशन या सगळ्या वस्तूंपासून जास्त किती उत्पन्न मिळते हे मी प्रचार मोहिमेदरम्यान शेतकऱ्यांसमोर मांडत होतो त्यामुळेच विठ्ठलाच्या सर्व ऊस उत्पादक सभासदांनी माझ्यावर विश्वास टाकून माझ्या हाती एकमताने सत्ता दिली त्यामुळेच मी ऊस दराच्या बाबतीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने पहिल्यांदा स्पर्धा सुरू केली आणि नंतर जे काही घडले ते आपण पाहतच आहात २५०० रुपयांच्या वर पहिली उचल देणे शक्य नाही म्हणणारे आज २८००/२९०० तीन हजार पहिली उचल देऊ लागले आहेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या घामाचा दाम मिळाला पाहिजे हीच शेतकरी पुत्र या नात्याने माझी भावना होती आणि ती मी आज प्रामाणिकपणे पाळत आहे आपल्या माढा तालुक्यातील कारखान्यांनी सुद्धा २५०० च्या वर देणे शक्य नाही म्हणत असताना आज स्पर्धेत उतरून दर जाहीर केला आहे आता कुठून आला पैसा असे उद्गार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची नवोदित चेअरमन अभिजीत पाटील यांनी टेंभुर्णी येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढा तालुका अध्यक्ष औदुंबर उर्फ भाऊसाहेब महाडिक देशमुख यांनी आयोजित केलेल्या नूतन ग्रामपंचायत सदस्य नूतन सरपंच उपसरपंच यांच्या सत्कार प्रसंगी काढले. ते म्हणाले भाऊसाहेब महाडिक हे कायम सर्वसामान्य जनतेमध्ये राहून सामाजिक कार्य करणारे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कार्याचा वारसा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणारे एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचे हे सामाजिक कार्य असेच कायम चालू राहावे. सामाजिक कार्य करत असताना शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या अडचणी असतात कुणाचा उसाचा प्रश्न असतो कुणाचा रस्त्याचा प्रश्न असतो कुणाचा पाण्याचा प्रश्न असतो हे प्रश्न सोडवण्यासाठी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कायम भाऊसाहेब महाडिक यांना सहकार्य करत राहणार आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न असेल तर विठ्ठल सहकारी साखर कारखाना या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहणार आहे या तालुक्यातील उसाला चांगला दर देऊन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करू परंतु शेतकऱ्यांनीही एकदम गडबड करू नये सगळ्यांचा शेवटचे टिपरु जाईपर्यंत आपला कारखाना बंद होणार नाही याची मी हमी देतो . माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष औदुंबर महाडिक-देशमुख यांच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अभिजित आबा पाटील, तालुक्यातील नूतन सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात होते
या कार्यक्रमास विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुढे बोलताना म्हणाले की नूतन तालुकाध्यक्ष औदुंबर महाडिक-देशमुख यांनी टेंभुर्णी शहरापुरते मर्यादित न रहाता माढा तालुक्यातील अडीअडचणी सोडवायच्या आहेत. टेंभुर्णी व माढा तालुक्यातील मोठी जबाबदारी तुमच्यावर देण्यात आली आहे व ही जबाबदारी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडतील असा विश्वास व्यक्त केला. व करत असलेल्या समाज उपयोगी कामाचे कौतुक केले.
यावेळी माढा विधानसभा मतदारसंघाचे नेते संजय(बाबा) कोकाटे , भाजपचे माढा तालुका अध्यक्ष व टेंभुर्णी बोबडे पार्टीचे नेते योगेश बोबडे, टेंभुर्णी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रतिनिधी सतीश नेवसे,जलतज्ञ अनिल पाटील, रा. काँ. जिल्हा निरीक्षक शेखर माने, पै.दत्ता मगर, पै.अमर जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष आबासाहेब साठे, कन्हेरगांव चे पार्टी प्रमुख लिंबाजी मोरे, ऋषिकेश बोबडे, नागेश काका बोबडे, डॉ राहुल पाटील, संजय पाटील घाटणेकर, अभिजित भांगे, युवा उद्योजक नानासाहेब पाटील (परांडा),नितिन कापसे, सापटणे (टें) चे माजी उपसरपंच दत्तात्रय ढवळे पाटील, उद्योजक बाळासाहेब ढेकणे, कन्हेरगांव गावचे युवा नेते प्रसाद मोरे, चव्हाणवाडी ग्रामपंचायतचे गटनेते ॲड सचिन चव्हाण,भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष इंदलकर,चव्हाणवाडीचे सरपंच नवनाथ शिंदे, माजी उपसरपंच हनुमंत चव्हाण, वडार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार धोत्रे, भाजप किसान मोर्चाचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष विष्णू बिचुकले, उद्योजक आय्युबभाई पटेल, शहाजहान काझी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण, विशाल नवगिरे,शरिफ काझी,चव्हाणवाडी चे, शब्बीर जहागिरदार,संदिप गाडे,इरफान रस्तापुरे,आझाद युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष अजीज शेख, उपाध्यक्ष शाजमान जहागिरदार, इम्तियाज सय्यद, वडार समाजाचे किंग मेकर म्हणून ओळखले जाणारे नामदेव महाराज धोत्रे, टेंभुर्णी चे माजी उप सरपंच प्रमोद कुटे, प्रहार संघटनेचे अमोल जगदाळे, महेश पाटील, डॉ मंगेश देशमुख , शिवसेनेचे अमोल धुमाळ,अमर काझी , जमाल काझी , राहुल चव्हाण, दत्तात्रय कोल्हे ,दीपक पाटील,यांच्या सह टेंभुर्णी व टेंभुर्णी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्वांची स्नेह भोजनाची सोय करण्यात आली होती.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अटके पार झेंडा ग्रुपचे अध्यक्ष दयानंद महाडिक-देशमुख व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी तर आभार टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील यांनी मानले.
यांचा झाला सन्मान*
रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य - अभिजित आबा पाटील,टेंभुर्णी सरपंच प्रतिनिधी - योगेश बोबडे, उपसरपंच प्रतिनिधी सतीश नेवसे, ग्रामपंचायत सदस्य सुधिर पाटील, नागनाथ वाघे,अमर कांबळे, कैलास सातपुते, तुकाराम डोके, ऋषीकेश बोबडे, राम पवार, सोमनाथ ताबे, बाळासाहेब ढगे. कन्हेंगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकांत बनसोडे, उपसरपंच लिंबाजी मोरे साहेब, ग्रामपंचायत सदस्य गणेश माने, समाधान चव्हाण, विठ्ठल मोरे, योगेश खोचरे, शशिकांत लोंढे, संतोष लोंढे, माने सर,व अंबाड ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब कुर्डे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप गाडे, समाधान कदम, जांबदेव सरवदे यांचा सन्मान करण्यात आला.
*पंढरीच्या विठ्ठलाचा धपका माढ्याच्या विठ्ठल ला हादरा*,,,, जिल्ह्याच्या राजकारणात मातब्बर म्हणून ओळखले जाणारा माळढ्याचा विठ्ठल कायम उस दराच्या बाबतीत जिल्ह्यातील इतर कारखान्यांशी आतुन संपर्क साधून शेतकऱ्यांना कमीत कमी दर कसा देता येईल ऊस दराची स्पर्धा टळून सगळे मिळून आजपर्यंत ऊस खरेदी करत होते परंतु इतर कारखान्यांनी २५०० ते २६०० पहिली उचल जाहीर केले असताना माढ्याच्या कापसेवाडी येथील माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या जाहीर सभेत अभिजीत पाटील यांनी 2750 रुपये जाहीर केले आणि मग मात्र सगळ्यांनीच ऊस दराच्या स्पर्धेला सुरुवात केली त्यामुळे पंढरीच्या विठ्ठलाचा धपक्का हादरा अशी चर्चा ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे
0 Comments