मेस्टा एफ च्या वतीने आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांना दिले निवेदन
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य इंग्लिश स्कूल ऑफ ट्रस्टीज ऑफ असोसिएशनच्या वतीने इंग्रजी शाळा बाबत असलेल्या अडीअडचणी संदर्भात जवळपास एक तास चर्चा करण्यात आली. त्यावेळी मेस्टा एफ च्या सर्व सदस्यांच्या वतीने मागण्याचे निवेदन आमदार मोहिते पाटील यांना देण्यात आले. त्यावेळी मान्य होणाऱ्या मागण्या यावर निश्चितच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या पुढे मांडून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनातही मांडू. संघटनेच्या मागण्या पुढील प्रमाणे आरटी 25% प्रतिस्पूर्तीबाबत चार ते पाच वर्ष विलंब होणारी रक्कम ताबडतोब मिळावी, आर टी ई मधील प्रवेश रद्द करून दुसऱ्या शाळेत गेले असेल तर त्या सालाची रक्कम पोर्टलवरून व्हेरिफाय करून देण्यात यावी किंवा रिक्त जागा आठवीपर्यंत भरण्यात याव्यात, आर टी ई नमुना नंबर दोन तात्काळ बंद करावा, क्रीडा विभागाच्या योजना त्वरित पूर्ववत कराव्यात, जि प सेस फंड मिळावा, आमदार खासदार फंड मिळावा, इतर शाळेप्रमाणे आमच्या शाळेत नाही शासनाच्या योजना मिळाव्यात, वीज बिलात सवलत मिळावी, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळावा, जिल्हा परिषदे कडून आर टी ई ची माहिती आमच्या शाळांना पूर्णपणे दिली जात नाही तरी ती मिळावी अशा प्रकारच्या मागण्या चे निवेदन आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांना देण्यात आले.
यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा धवलसिंह स्कूल मंगळवेढ्याचे हरीश शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक तथा संघटनेचे सचिव गणेश नीळ, एस पी पब्लिक स्कूल नांदोरेचे डॉ.संतोष वलगे, आदर्श पब्लिक स्कूल कुर्डूवाडीचे अमोल सुरवसे, प्रगती पब्लिक स्कूल कुर्डूचे आनंत कवळस, ट्विंकल स्टार टेंभुर्णीचे प्रा.हरिश्चंद्र गाडेकर, गुरुकुल पब्लिक स्कूल करमाळ्याचे नितीन भोगे, स्नेहालय पब्लिक स्कूल करमाळ्याचे जयंत दळवी, फिनिक्स इंग्लिश स्कूल मोहोळचे कृष्णदेव मदने, अक्षर संस्कार देवडीचे नितीन डोंगरे, श्रद्धा इंग्लिश स्कूल मोहोळचे सुनील झाडे, इनीव्हेटिव्ह स्कूल अंकोलीचे रियाज तांबोळी, ब्रह्मचैतन्य स्कूल तांदुळवाडीचे संजय मोहिते, न्यू डायमंड स्कूल श्रीपुरचे हेमंत बर्डे, ज्ञानदीप स्कूल बोंडलेचे दत्तात्रय पवार, अमोल पिसे स्कूल पिलीव चे सागर सरगर, शिवरत्न पब्लिक स्कूल गादेगावचे गणपत मोरे, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल बेंबळेचे विकास अनपट तसेच याचबरोबर अनेक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

0 Comments