आमचा झेंडा घ्या हाती...! देऊ तुम्हाला मलईदार खाती...!! हीच भाजपाची नीती...!!
सोलापूर (दादासाहेब निळ):- देशात आणि राज्यात 2014 पासून भाजपाची ताकद वाढू लागल्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पुन्हा एकदा जिंकण्यासाठी आणि सत्तेच्या गादीवर विराजमान होण्यासाठी भाजपा प्रचंड मोठे रणनीती वापरून लोकशाहीच्या या देशामध्ये एक प्रकारे हुकूमशाहीला आमंत्रण देत असल्याचे दिसत आहे. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स या संस्थांची मदत घेऊन भाजपाने देशातील आणि राज्यात राज्यातील विरोधी पक्षाच्या आमदार आणि खासदारांना भीतीचं वातावरण निर्माण करून फोडाफोडीचे राजकारण केल्याचं दिसत आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एखाद्या नेत्याच्या विरोधात प्रचंड रान पेटवायचं, एकच महिन्यामध्ये अमुक अमुक नेता कारागृहामध्ये जाणार अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा द्यायच्या, तरीही एखादा नेता निष्ठा सोडायला तयार नसल्यास त्याच्या मागे हात धुवून भुंगा सोडायचा एक कलमी कार्यक्रम भाजपाच्या वतीने देशात आणि राज्यात होताना दिसतोय. देश भ्रष्टाचार मुक्त व्हावा ही भाजपची संकल्पना अतिशय चांगली असली तरी सुद्धा भाजपा आपल्या पक्षातील किंवा मित्र पक्षातील एकाही नेत्याची चौकशी लावत नाही. यावरून भाजपाला देश भ्रष्टाचार मुक्त नको आहे तर देश भाजपा युक्त करायचा आहे असं नागरिकांतून बोललं जात आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडल्यानंतर आणि ईडीचा भुंगा पाठीमागे लावल्यानंतर त्या नेत्याने नाईलाजाने भाजपा झेंडा हाती घेतला की सारे काही स्वच्छ आणि पारदर्शक असल्याचा कांगावा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नष्ट करण्यासाठी आणि शरद पवार गट नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांच्या गटातील आमदार खासदारांना ईडीची भीती दाखवली जाते. बाकी सर्व आमदार खासदार हे एवढे स्वच्छ आणि धुतल्या तांदळासारखे आहेत . हे सर्टिफिकेट आमदार खासदारांना हे सरकारच देत असल्याचे दिसतय. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 2014 च्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्याचा प्रश्न उपस्थित करून तुरुंगात टाकण्याची भाषा वापरली होती. आज तेच देवेंद्र फडणवीस अजित दादाच्या गळ्याला गळा लावून फिरताना दिसत आहेत. जीवात जीव असेपर्यंत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीतच राहील असे जाहीरपणे बोलणारे अजित दादा एका रात्रीत भाजपाच्या वळचणीला पदासाठी गेलेत? का भीतीपोटी गेलेत? हे मात्र न उलगडणार कोड आहे. 2004 प्रमाणे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सत्तर च्या पुढे आमदार निवडून आणण्याचा चंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधला असल्यामुळेच ते आपल्या काकांना म्हणजेच पवारांना सातत्याने आम्हाला आशीर्वाद द्या असे साकडे घालत आहेत. परंतु 83 वर्षाचा हा तरुण युद्ध आपण भाजपाच्या विरोधात लढणार..! आपला पक्ष पुरोगामी विचाराच्या वाटेवरून चालणार असल्यामुळे शरद पवार भाजपाकडे जाण्यासाठी किंवा पाठिंबा देण्यासाठी अजिबात तयार नसल्यामुळे अजित दादा गटाची फार मोठी पंचायत झाली असून धरलं तर चावतय आणि सोडलं तर पडतंय अशी अवस्था दादा गटाची झाल्याच दिसते. अनेक आमदार आणि खासदार घेऊन जरी अजितदादा भाजपाच्या अडचणीला गेले असले तरीसुद्धा मोजकेच आमदार घेऊन शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढू लागल्यामुळे त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळू लागल्यामुळे दादा गटाची सेनापती भरपूर असतानासुद्धा रणांगणावर पवार साहेबांच्या गुगली ला अजित दादांना उत्तर देता येणार नसल्यामुळे येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेत काय राजकीय समीकरणे असतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवसेना कोणाची..! या प्रश्नाचं उत्तर अजूनही न्यायालयाला देता आलं नाही. तोच मुद्दा घेऊन राष्ट्रवादी कोणाची..! दोन्ही गटाला सांगण्यासाठी अल्टिमेटम मिळालेला आहे. अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी बंडाचं झेंडा हाती धरला का ईडीच्या भीतीपोटी बंद केलं हे मात्र सर्वसामान्य मतदाराच्या मनातलं कोड अजित पवारांशिवाय बाहेर पडणार नाही. राज्याला 2014 मध्ये उपमुख्यमंत्री मिळाला नाही आणि सद्यस्थितीमध्ये दोन दोन उपमुख्यमंत्री आणि अनेक जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यामुळे एकच मंत्री सहा सहा जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याचं महाराष्ट्रन प्रथमच पाहिलेला आहे. "फोडा आणि राज्य करा" अशीच नीती भाजपा आणि त्यांच्या हाय कमांड कडून राबविली जाऊ लागल्यामुळे पवारांनी सुद्धा इंडिया आघाडीतून जोरदार शक्ती प्रदर्शन करून सत्तांतर करण्याचा विडा उचलल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. सध्या शरद पवार ज्या भागात जातात त्या ठिकाणी ते सभा गाजवत असल्याचे दिसत लागल्यामुळे या सरकारची झोप पवारांच्या तोफेमुळे उडाले आहे. शरद पवारांच्या मुत्सद्दी राजकारणाची सध्या राज्यात नव्हे तर देशात चर्चा होऊ लागल्यामुळेच इंडिया आघाडीला पवारांशिवाय पर्याय उरलेला नाही त्यामुळेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवार हे महाआघाडीचे प्रमुख नेते असल्याचे मान्य केले असून बारामती मध्ये सुप्रिया सुळे यांच्या पाठीमागे शिवसैनिकांनी खंबीरपणे उभे राहण्याचा आवाहन सुद्धा केलेला आहे. देशाच्या राजकारणात शरद पवारांना अतिशय मानाचे स्थान असले तरीसुद्धा त्यांना त्यांच्या कार्यकर्ते मध्ये पंतप्रधानपद प्राप्त करता आलं नाही. अगदी तशाच प्रकारे राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा अजितदादा पवार यांना वजनदार नेता म्हणून मान्यता आहे. अजित दादा पवार एकदाच नव्हे तर तीन ते चार वेळा उपमुख्यमंत्री पदावरच बसले मात्र त्यांचेही मुख्यमंत्री पदाचे स्वप्न अद्याप पर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. काका पुतण्यांची स्वप्ने एकसंघ राहिल्यानंतरच पूर्ण होऊ शकतील अन्यथा पक्षाची फार मोठी पडझड झाल्याशिवाय राहणार नाही असे नागरिकांतून बोलले जात आहे.
.png)
No comments:
Post a Comment