रस्त्यावर हजारो जनावरांचा कळप..! पालिका यंत्रणा शांत...!! नागरिकांच्या सहनशीलतेचा होतोय अंत..!!! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 22, 2023

रस्त्यावर हजारो जनावरांचा कळप..! पालिका यंत्रणा शांत...!! नागरिकांच्या सहनशीलतेचा होतोय अंत..!!!

 रस्त्यावर हजारो जनावरांचा कळप..!  पालिका यंत्रणा शांत...!!  नागरिकांच्या सहनशीलतेचा होतोय अंत..!!!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या सोलापूर शहराच्या चारही दिशांना मोकाट जनावरांनी पूर्णपणे वेढा दिलेला आहे. हे मोकाट जनावरांचे कळप रस्त्यावरून मध्यभागी फिरतात त्यामुळे वाहनधारकांना अनेक वेळा अपघाताला सामोरे जावे लागत आहे. अनेक मोकाट जनावरे मुख्य चौकातच आपला ठिय्या मांडून बसतात. मुक्या जनावरांना बोलता येत नसल्यामुळे त्यांची काहीच चूक नाही परंतु त्यांना पकडून कोंडवड्यात टाकणारी महापालिकेची यंत्रणा सुद्धा सध्याच्या काळात कुठेच दिसत नाही संपावर गेले की काय असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. चौका चौकात जनावरे मोकाट तरीही पालिका प्रशासन आणि यंत्रणा शांत असल्यामुळे या गुरांचा सर्वच वाहनधारक पादचारी यांना त्रास होऊ लागलेला आहे. चरण्यासाठी काही पशुपालक जनावरांना दिवसभर मोकाट सोडून देतात आणि रात्री मात्र दूध काढण्यासाठी घरी घेऊन जात असल्याचे काही ठिकाणी दिसून आल्याचे बोलले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाजी मंडई,  टिळक चौक, मधला मारुती, मंगळवार बाजार,  जोडभावी पेठ, जोड बसवांना चौक, सिव्हिल चौक, रंगभवन ,पार्क चौक,  रेल्वे लाईन,  सात रस्ता,  आसरा चौक आदी मुख्य चौकासह इतरत्र सर्वत्र सध्या मोकाट जनावरांनी हैदोस घातलेला दिसतोय. तरीही पालिकेची प्रशासना झोपेचं सॉंग घेऊन नुसतच पाट्या टाकण्याचे काम करू लागल्याचे दिसत आहे. या मोकाट जनावरांना कोंडण्यासाठी महापालिकेच्या वतीने पोटफाडी चौकामध्ये कोंडवाडा बांधलेला आहे. परंतु कोंडवाडा रिकामा आणि जनावर मात्र रस्त्यावर हे वस्तुस्थिती सध्या संपूर्ण शहरांमध्ये दिसल्या मुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.महापालिकेचे गुरे वाहक वाहन गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यावर दिसत नाही ते कुठे लावले आहे हे कळायला मार्ग नाही आणि जर हे वाहन आलेच तर त्यामध्ये एक दोन वाहने टाकून हे कर्मचारी दिवसाचं काम झालं असं समजून पुन्हा या मोकाट जनारांकडे फिरकत सुद्धा नसल्याचे दिसून येत आहे. अनेक समस्यांनी त्रस्त असणारे सोलापूरकर मात्र सध्या या मोकाट जनावरांच्या गर्दीतूनच कसाबसा मार्ग काढून आपले घर गाठत असल्याचे दिसत आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोकाट जनावरे ताब्यात घेऊन या जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय खऱ्या अर्थाने सोलापुरातील ही गुरांची जत्रा थांबणार नाही हे मात्र निश्चित..!

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages