पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी सणाच्या योग मुहूर्तावर सिद्धेश्वर देवस्थान वेबसाईटचे झाले उद्घाटन..!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाही श्रावण मासानिमित्त ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या योग समाधीला नयनरम्य आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं असून योग समाधीवरील मेघ डमरीला विविध रंगी ला सह ओम, त्रिशूळ, डमरू, नागफणी, मध्यभागी शिवलिंग आणि सिद्ध रामेश्वराची मूर्ती अशी आकर्षक सजावट करण्यात आली असून यंदा पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी सण असा योग जुळून आल्यामुळे हेच औचित्य साधून सिद्धेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने सिद्धेश्वर देवस्थान वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती सिद्धेश्वर देवस्थान कमिटी अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली. 12 व्या शतकातील सिद्धेश्वर देवस्थान आणि सिद्धरामेश्वराचे कार्य या संदर्भातील सचित्र माहिती तसेच 68 लिंग यावर आधारित विशेष माहिती ..! देवस्थानची एकशे पंचवीस वर्षाची कारकीर्द सुद्धा या वेबसाईट मध्ये दिल्यामुळे येणाऱ्या भाविकांना या वेबसाईटचा नक्कीच फायदा होईल असेही यावेळी बोलताना धर्मराज काळात यांनी सांगितले. सिद्ध रामेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्या अडचणी आल्यास त्यांनी मंदिर समितीची चर्चा करावी निश्चितपणे त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही देवस्थानच्या माध्यमातून प्रयत्न करू असेही यावेळी शेवटी बोलताना धर्मराज काडादी यांनी सांगितले.
.png)
No comments:
Post a Comment